बाप्परे, भाच्याच्या रडण्यामुळे डोकं दुखत असल्यामुळे मामानेच भाच्याला पाण्याच्या ड्रम मध्ये बुडून ठार मारले

धुळ्यात भाच्याच्या रडण्यामुळे डोकं दुखत असल्यामुळे संतप्त झालेल्या मामानेच भाच्याला पाण्याच्या ड्रम मध्ये बुडून ठार मारलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपी मामाने आपणच भाच्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

धुळे शहरातील फिरदोस नगर मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. भाच्याच्या रडण्याच्या त्रासाला कंटाळून मामाने भाच्याला ड्रम मध्ये बुडून ठार मारले आहे. शहरातील फिरदोस नगर येथे आजोळी हा भाचा आला होता. अवघ्या चार वर्षांच्या मोहम्मद हाजीक एजाज अहमद असं मयत मुलाचे नाव आहे. जोरजोरात रडण्याच्या कारणावरून संतापलेल्या नूरुल अहमद याने भाचा मोहम्मद हजिकला पाण्याच्या ड्रममध्ये बुडून मारले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपण मोहम्मद हाजीक एजाज अहमदला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारल्याची कबुली नूरुल अहमद याने दिली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

धुळ्यातील फिरदोस नगरमधील पीडित मुलाची आई माहेरी आली होती. त्यानंतर महिलेचा पती कामावर निघून गेला होता. महिलेचा लहान मुलगा हाजिक हुसैन व लहान भाऊ नुरूल अहमद नईम अहमद हे दोघे घरात खेळत होते. त्यावेळी आरोपी मामा आणि भाचा खेळत असताना मोहम्मद हाजी एजाज हुसैन रडत होता. त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे आरोपीला त्रास होऊ लागला. रागाच्या भरात त्याने लहानग्या भाच्याला पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये बुडवले. अचानक मुलाचा आवाज बंद झाल्यामुळे त्याची आई काय झालं पाहायला गेली. महिलेला प्लास्टिक ड्रममध्ये मुलगा खाली डोकं वरती पाय अशा अवस्थेत आढळला.

Go to Source