चालक क्रिकेट मॅच पाहत असल्यानेच रेल्वेदुर्घटना

आंध्र रेल्वे दुर्घटनेप्रकरणी रेल्वेमंत्र्यांचा खुलासा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आंध्रप्रदेशात 29 ऑक्टोबर रोजी दोन प्रवासी रेल्वेंची टक्कर होत 14 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा चौकशी अहवाल आता समोर आला आहे. या अहवालातून रेल्वेचालकाचा घोर निष्काळजीपणा समोर आला आहे. दोन प्रवासी रेल्वे जेव्हा परस्परांना धडकल्या होत्या, तेव्हा यातील एका रेल्वेचा चालक आणि त्याचा सहाय्यक फोनवर क्रिकेटचा […]

चालक क्रिकेट मॅच पाहत असल्यानेच रेल्वेदुर्घटना

आंध्र रेल्वे दुर्घटनेप्रकरणी रेल्वेमंत्र्यांचा खुलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंध्रप्रदेशात 29 ऑक्टोबर रोजी दोन प्रवासी रेल्वेंची टक्कर होत 14 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा चौकशी अहवाल आता समोर आला आहे. या अहवालातून रेल्वेचालकाचा घोर निष्काळजीपणा समोर आला आहे. दोन प्रवासी रेल्वे जेव्हा परस्परांना धडकल्या होत्या, तेव्हा यातील एका रेल्वेचा चालक आणि त्याचा सहाय्यक फोनवर क्रिकेटचा सामना पाहत होते असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.
या दुर्घटनेनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्ताकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. हा चौकशी अहवाल अद्याप उघड करण्यात आलेला नाही. परंतु रेल्वेच्या प्रारंभिक चौकशीत रायगढ पॅसेंजर रेल्वेचा चालक आणि सहाय्यक चालकाला दुर्घटनेसाठी जबाबदार ठरविण्यात आले होते. आता क्रिकेट मॅच पाहण्याची बाब समोर आली आहे.
वैष्णव यांनी यादरम्यान नव्या सुरक्षा उपाययोजनांबद्दलही भूमिका मांडली आहे. आंध्रप्रदेशात झालेली दुर्घटना ही लोको पायलट आणि को-पायलट दोघेही क्रिकेट मॅच पाहत असल्याने झाली होती. आता अशाप्रकारच्या कुठल्याही डिस्ट्रॅक्शनचा शोध लावणारी यंत्रणा आणली जात आहे. पायलट आणि को-पायलट स्वत:चे पूर्ण लक्ष रेल्वे चालविण्यावर देत आहेत की नाही हे या यंत्रणेमुळे समजणार आहे.
सुरक्षेवर स्वत:चे लक्ष केंद्रीत करणे जारी ठेवणार आहोत. प्रत्येक घटनेचे मूळ कारण शोधून काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तसेच एक उपाययोजना लागू करतो, जेणेकरून अशाप्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये अशी माहिती वैष्णव यांनी दिली आहे.
रायगढ पॅसेंजर रेल्वेचा चालक आणि सह-चालकाला दुर्घटनेसाठी जबाबदार ठरविण्यात आले होते. दोघांनीही नियमांचे उल्लंघन करत दोन डिफेक्टिव्ह ऑटो सिग्नल पास केले हेतसश तसेच समोर उभ्या विशाखापट्टणम पलासा रेल्वेला मागून धडक दिली होती. आंध्रप्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील कंटाकापल्लीमध्ये हावडा-चेन्नई मार्गावर ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 14 प्रवासी मृत्युमुखी पडले होते तर 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.