अनगोळमध्ये टिप्पर उलटला सुदैवाने कोणालाही इजा नाही

बेळगाव : खडीने भरलेला टिप्पर उलटल्याची घटना गुरुवारी अनगोळ परिसरात घडली. या घटनेत कोणालाही इजा पोहोचली नसली तरी टिप्परमधील खडी रस्त्यावर विखुरली गेल्याने काहीकाळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत घालण्यात आलेल्या भूमिगत केबलसाठीच्या चेंबरवर स्लॅब घालण्यात आला होता. या स्लॅबवरच खडीने भरलेला टिप्पर उभा होता. टिप्परच्या वजनाने स्लॅब खचून टिप्पर कोसळला. क्रेनने टिप्पर […]

अनगोळमध्ये टिप्पर उलटला सुदैवाने कोणालाही इजा नाही

बेळगाव : खडीने भरलेला टिप्पर उलटल्याची घटना गुरुवारी अनगोळ परिसरात घडली. या घटनेत कोणालाही इजा पोहोचली नसली तरी टिप्परमधील खडी रस्त्यावर विखुरली गेल्याने काहीकाळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत घालण्यात आलेल्या भूमिगत केबलसाठीच्या चेंबरवर स्लॅब घालण्यात आला होता. या स्लॅबवरच खडीने भरलेला टिप्पर उभा होता. टिप्परच्या वजनाने स्लॅब खचून टिप्पर कोसळला. क्रेनने टिप्पर बाजूला काढण्यात आला. यासंबंधी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता गुरुवारी रात्रीपयर्तिं या घटनेची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.