घरफोडीसाठी आलेल्या चोरट्याला संधी न मिळाल्याने लांबविले बूट

काळी आमराईतील प्रकार सीसीटीव्हीत कैद बेळगाव : घरफोडीच्या उद्देशाने एका अपार्टमेंटमध्ये शिरलेल्या चोरट्याच्या हाती काहीच गवसले नाही म्हणून त्याने अपार्टमेंटमधून बूट चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. चोर चोरीसाठी कसे येतात? एखाद्या घरात कसे प्रवेश करतात? याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. चोरी करण्याआधी बंद घरांची पाहणी केली जाते. घरात […]

घरफोडीसाठी आलेल्या चोरट्याला संधी न मिळाल्याने लांबविले बूट

काळी आमराईतील प्रकार सीसीटीव्हीत कैद
बेळगाव : घरफोडीच्या उद्देशाने एका अपार्टमेंटमध्ये शिरलेल्या चोरट्याच्या हाती काहीच गवसले नाही म्हणून त्याने अपार्टमेंटमधून बूट चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. चोर चोरीसाठी कसे येतात? एखाद्या घरात कसे प्रवेश करतात? याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. चोरी करण्याआधी बंद घरांची पाहणी केली जाते. घरात कोणी नाही याची खात्री पटल्यानंतर प्रत्यक्षात कडीकोयंडा तोडून त्या घरात प्रवेश केला जातो. घरातील किमती वस्तू पळविली जाते. काळी आमराई येथील एका अपार्टमेंटमध्ये चोरीसाठी शिरलेल्या एका चोराला मात्र कोणत्याच घरात चोरी करता आली नाही. शेवटी त्याने अपार्टमेंटच्या जिन्यावर ठेवलेले बूट चोरले आहेत. गुरुवारी मध्यरात्री झालेला चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दिनेश बांदेकर यांच्या घरासमोरील बूट चोरण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. अपार्टमेंटमधील घरांना कुलूप नसल्याने कुटुंबे घरात असल्याची चाहूल लागल्याने चोरट्याला डाव साधता आला नाही. जाता जाता चोरट्याने बूट पळविले आहेत.