‘सनबर्न’च्या सहाशे पासची चोरी
खुद्द सनबर्नच्याच पाच कर्मचाऱ्यांना अटक
म्हापसा : वागातोर येथे सनबर्न फेस्टिव्हलच्या काऊंटरमधील 82.50 लाख ऊपये किमतीच्या 600 पासांची चोरी झाल्याचा प्रकार काल शुक्रवारी उघडकीस आहे. याबाबत सनबर्नचे सहसंयोजक अरविंद कुमार यांनी हणजूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भादंसं 381 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून सनबर्नच्या पाच कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांचा रिमांड देण्यात आला आहे, अशी माहिती निरीक्षक प्रशल देसाई यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयितांमध्ये शिवम च्यारी, महेश गावस, मंजित गावस, यासिन मुल्ला आणि सिद्धगौडा हंचीनाल यांचा समावेश आहे. सर्व संशयित सनबर्न फेस्टिव्हलचे कर्मचारी असून ते फोंडा येथील रहिवाशी आहेत. सदर संशयितांकडून 50 लाखांची तिकिटे जप्त केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. राज्यात 28 डिसेंबरपासून सनबर्नची धामधूम सुरू झाली आहे. यामध्ये जगभरातून लाखो पर्यटक येतात. देश विदेशांतील तऊणाईचा या वर्ष समाप्तीच्या पार्टीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या सनबर्नच्या पाससाठी राजकीय नेत्यांकडे मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे. मात्र येथे काम करणाऱ्या सनबर्नमधील काऊंटरमधील 82.50 लाखांचे 600 पास गायब झाल्याची तक्रार आयोजकांनी हणजूण पोलीस स्थानकात दिली असून याप्रकरणी हणजूण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सनबर्नने दुखविल्या हिंदुंच्या भावना : आप
सनबर्नमध्ये आयोजकांकडून क्रीनवर श्री महादेवाचा फोटो दाखवल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, हिंदू धर्माच्या देवतांना अशा कार्यक्रमात दाखवल्याने अनेक हिंदू धर्मीय बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षातर्फे पोलिसांत सनबर्न आयोजकांविऊद्ध तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आपचे समन्वयक अॅड. अमित पालेकर यांनी दिली. भाजपतर्फे सनातन धर्माविषयी वारंवार बोलले जात आहे. सनबर्नमध्ये घडलेला हा प्रकार विद्यमान सरकारला दिसत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी भाजपला सनातन धर्माचा वापर करणे गरजेचे वाटते. परंतु आम आदमी पक्षातर्फे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे पालेकर म्हणाले.
Home महत्वाची बातमी ‘सनबर्न’च्या सहाशे पासची चोरी
‘सनबर्न’च्या सहाशे पासची चोरी
खुद्द सनबर्नच्याच पाच कर्मचाऱ्यांना अटक म्हापसा : वागातोर येथे सनबर्न फेस्टिव्हलच्या काऊंटरमधील 82.50 लाख ऊपये किमतीच्या 600 पासांची चोरी झाल्याचा प्रकार काल शुक्रवारी उघडकीस आहे. याबाबत सनबर्नचे सहसंयोजक अरविंद कुमार यांनी हणजूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भादंसं 381 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून सनबर्नच्या पाच कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यांना येथील न्यायालयात […]