अर्धा भारत भाजपमुक्त झाल्याचा टोला ठाकरे गटाने मोदींना लगावला

अर्धा भारत भाजपमुक्त झाल्याचा टोला ठाकरे गटाने मोदींना लगावला

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महाराष्ट्रात माविआ ने 30 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीला 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. यंदा पुन्हा देशात तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनत असून येत्या 9 जून रोजी शपथग्रहण समारंभ आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपची दमछाक झाली. यंदा भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलं नाही. त्यांना मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली. 

मोदींनी 2014 साली काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला. काँग्रेसने या निवडणुकीत त्यांच्या गर्वाचा हरण केला आहे. काँग्रेस मुक्त भारत करता करता अर्धा भारत भाजपमुक्त झाला आहे असा टोला ठाकरे गटाकडून सामनाया अग्रलेखातून लगावला आहे. 

 

यंदा भाजपला उत्तरप्रदेश, तामिळनाडू सारख्या मोठ्या राज्यात देखील एकही जागा मिळाली नाही. पंजाब मध्ये देखील भाजप काहीच करू शकली नाही. तर मेघालय, नागालँड, मणिपूर, सिक्क्कीम मध्ये भाजपचे काहीच काम केले नाही. 

मोदींनी सत्तेसाठी पक्ष फोडला. नंतर तडजोड केली. मोदी यांनी जे ठरवले तसे काहीच झाले नाही. काँग्रेसमुक्त भारत करण्याचा नादात अर्धा भारत भाजपमुक्त झाला असा टोला मोदींना ठाकरे गटाने लगावला आहे. 

Edited by – Priya Dixit  

 

Go to Source