मनपाच्या स्थायी समितींची मुदत 31 मे रोजी संपुष्टात
आचारसंहिता संपल्यानंतर जूनमध्येच होणार निवडणूक : आतापासूनच इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात
बेळगाव : महानगरपालिकेतील चार स्थायी समितींचा अवधी शुक्रवार दि. 31 मे रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर जूनमध्ये तातडीने या स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आतापासूनच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती, आरोग्य व शिक्षण स्थायी समिती, अर्थ व कर स्थायी समिती, लेखा स्थायी समिती आहेत. या समितींची निवड होऊन एक वर्ष संपत आहे. त्यामुळे आता चारही स्थायी समितींची निवडणूक घ्यावी लागणार आहे. या स्थायी समितींच्या निवडणुकीसाठी आता हालचालींना वेग आला आहे. मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहिता संपणार आहे. त्यानंतर तातडीने या चारही स्थायी समितींची निवडणूक घेण्यात येणार आहे, अशी माहिती कौन्सिल विभागातून देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आचारसंहिता लागू झाल्याने महानगरपालिकेतील सभागृहाचे कामकाज पूर्णपणे बंद झाले. सभागृहासह महापौर, उपमहापौर, सत्ताधारी आणि विरोधी गटनेते यांचे कक्षदेखील बंद करण्यात आले. याचबरोबर सर्व स्थायी समितीच्या अध्यक्षांचे कक्षही बंद करून त्यांचे फलकही काढण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुन्हा निवडणूक होणार असून त्याची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू झाली आहे.
सत्ताधारी गट विरोधी गटातील नगरसेवकांना संधी देणार का?
एका स्थायी समितीमध्ये 7 सदस्य निवडले जातात. त्यानंतर त्यामधून अध्यक्षाची निवड केली जाते. चार स्थायी समितीसाठी एकूण 28 नगरसेवकांना निवडले जाणार असून अनेकजण त्यासाठी इच्छुक आहेत. सत्ताधारी बरोबरच विरोधी गटातीलही नगरसेवकांना या स्थायी समितीमध्ये सामावून घेतले जाते. मात्र यावेळी सत्ताधारी गट विरोधी गटातील नगरसेवकांना संधी देणार का? हे पहावे लागणार आहे.
Home महत्वाची बातमी मनपाच्या स्थायी समितींची मुदत 31 मे रोजी संपुष्टात
मनपाच्या स्थायी समितींची मुदत 31 मे रोजी संपुष्टात
आचारसंहिता संपल्यानंतर जूनमध्येच होणार निवडणूक : आतापासूनच इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात बेळगाव : महानगरपालिकेतील चार स्थायी समितींचा अवधी शुक्रवार दि. 31 मे रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर जूनमध्ये तातडीने या स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आतापासूनच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती, आरोग्य व शिक्षण स्थायी समिती, अर्थ व […]