सावधान! राज्यात उष्णतेचा पारा वाढणार

Weather News : महाराष्ट्र राज्यात उष्णतेचा पारा सध्या खूप वाढतांना दिसत आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना पुढील दोन दिवस उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो. तापमान पुन्हा एकदा वाढत असल्याने पुढील काही दिवसउष्णता लोकांसाठी त्रासदायक …

सावधान! राज्यात उष्णतेचा पारा वाढणार

Weather News: महाराष्ट्र राज्यात उष्णतेचा पारा सध्या खूप वाढतांना दिसत आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना पुढील दोन दिवस उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.  

ALSO READ: मुंबई: हाय स्पीड टेम्पोने सिग्नल तोडला, वृद्ध महिलेचा मृत्यू
तापमान पुन्हा एकदा वाढत असल्याने पुढील काही दिवसउष्णता लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. सोमवारी मुंबई आणि ठाण्यात पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णता वाढली.  

ALSO READ: पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक
तसेच हवामान विभागानुसार, कोकणात प्रचंड तापमान वाढत असून उष्ण हवामानाचा यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. तसेच पुढील पाच दिवस महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढणारअसून काही भागात हलक्या पावसाचीही शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मंगळवार आणि बुधवारी तापमानात आणखी वाढ होऊ शकते. तापमान वाढण्याचे कारण पूर्वेकडून येणारे उष्ण वारे आहे. तसेच गुरुवारपासून मुंबईचे तापमान थोडे कमी होण्याची अपेक्षा आहे. यावेळी मार्चपासूनच उष्णता सुरू झाली आहे. एप्रिलमध्येच तापमान इतके वाढले आहे की जणू काही मे आणि जून आहे. जोरदार उष्ण वारे उष्णतेच्या लाटेत रूपांतरित झाले आहे.

ALSO READ: मुंबई-पुणे महामार्गावरील दापोडी परिसरात रात्री कारला भीषण आग
Edited By- Dhanashri Naik

Go to Source