ताम्हण बहरला…..!
Tamhan, State tree Of Maharashtra राधानगरी तालुक्यातील मांगोली येथील प्राथमिक शाळेच्या आवारात रखरखत्या उन्हाळ्यात महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेला ताम्हण वृक्ष फुलांनी बहरला आहे. मेंदीच्या कुळातील भक्कम असा हा वृक्ष आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. याला 1 मे च्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिनी हा फुलत असल्याने महाराष्ट्राचे राज्यपुष्प म्हणून त्याची ओळख आहे. ताम्हण फूल लालसर-जांभळे असते. मूळचे उपखंडातील असणारे हे फूल आपल्या लावण्य गुणांमुळे आता युरोप-अमेरिकेतही पोहोचले आहे.
Home महत्वाची बातमी ताम्हण बहरला…..!