राज्य सरकार देशातील पहिले ‘इंडस्ट्रियल एआय धोरण’ राज्यातील औद्योगिक क्षेत्रांत लागू करणार

महाराष्ट्र सरकार पुढील तीन ते चार महिन्यांत देशातील पहिले ‘इंडस्ट्रियल एआय धोरण’ राज्यातील औद्योगिक क्षेत्रांत लागू करणार असून या पार्श्वभूमीवर, उद्योगांमधील तांत्रिक बाबींमध्ये ‘एआय’चा प्रभावी वापर कसा करता येईल आणि त्याचा प्रत्यक्ष रोजगारावर काय …

राज्य सरकार देशातील पहिले ‘इंडस्ट्रियल एआय धोरण’ राज्यातील औद्योगिक क्षेत्रांत लागू करणार

महाराष्ट्र सरकार पुढील तीन ते चार महिन्यांत देशातील पहिले ‘इंडस्ट्रियल एआय धोरण’ राज्यातील औद्योगिक क्षेत्रांत लागू करणार असून या पार्श्वभूमीवर, उद्योगांमधील तांत्रिक बाबींमध्ये ‘एआय’चा प्रभावी वापर कसा करता येईल आणि त्याचा प्रत्यक्ष रोजगारावर काय परिणाम होईल, याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.

ALSO READ: अजित पवारांचा विमान अपघात चौकशीचा अहवाल या दिवशी येणार, मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती
कंपन्यांमधील उत्पादनासाठी कर्मचारी आणि कामगार वर्ग अनिवार्य असून तांत्रिक कामात एआयची मदत घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषेदत दिली.

 ALSO READ: पुण्यात आईच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

चिचंवड येथे एमआयडीसी कर्मचारी वसाहतीच्या उदघाटन प्रसंगी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी  उद्योगविषयक व एमआयडीसीबाबत विविध मुद्यांवर माहिती दिली. एमआयडीसी अंतर्गत विविध प्रकल्प व कामे देखील प्रगतीपथावर असून ती कामे पूर्णत्वाकडे गेल्यानंतर वाहतूककोंडीची समस्या दूर होईल, असे ते म्हणाले.

ALSO READ: शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, सुप्रिया सुळे यांनी दिले अपडेट
या धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगाराच्या संधींवर काय परिणाम होऊ शकतो आणि त्यावर कोणते प्रतिबंधात्मक उपाय योजता येतील.या तांत्रिक बदलांसोबतच प्रशासकीय सुधारणांवर भर देत, एमआयडीसी क्षेत्रातील सर्व अतिक्रमणे येत्या सहा महिन्यांत हटवली जातील, असेही मंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Edited By – Priya Dixit

 

Go to Source