सर्वात लहान विमानतळ

केवळ 400 मीटरची आहे धावपट्टी विमानप्रवास केलेल्या लोकांनी विमानतळावरील सुविधा अनुभवल्या असतील. दिल्ली-मुंबईच नव्हे तर देशाच्या अन्य छोट्या विमानतळांवरही कमालीच्या सुविधा मिळत असतात. आराम करण्यापासून खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था असते, परंतु सर्वात छोट्या विमानतळावर काय असेल याचा विचार करून पहा. या विमानतळावर विमानाचे लँडिंग करणे अत्यंत धोकादायक मानले जाते. कॅरेबियनच्या सबा बेटावर जुआंचो यरॉस्क्विन विमानतळ असून […]

सर्वात लहान विमानतळ

केवळ 400 मीटरची आहे धावपट्टी
विमानप्रवास केलेल्या लोकांनी विमानतळावरील सुविधा अनुभवल्या असतील. दिल्ली-मुंबईच नव्हे तर देशाच्या अन्य छोट्या विमानतळांवरही कमालीच्या सुविधा मिळत असतात. आराम करण्यापासून खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था असते, परंतु सर्वात छोट्या विमानतळावर काय असेल याचा विचार करून पहा. या विमानतळावर विमानाचे लँडिंग करणे अत्यंत धोकादायक मानले जाते. कॅरेबियनच्या सबा बेटावर जुआंचो यरॉस्क्विन विमानतळ असून येथील धावपट्टी केवळ 400 मीटरची आहे. हे अत्यंत छोटे बेट असून यातील धावपट्टी केवळ 1300 फूट लांब म्हणजेच 400 मीटर इतकी आहे. यातील केवळ 900 फूटांचाच वापर होत असतो. याचमुळे ही जगातील सर्वात छोटी कमर्शियल धावपट्टी आहे.
या विमानतळाला सबा बेटासाठी लाइफलाइन मानले जाते, कारण याच विमानतळाच्या माध्यमातून पर्यटक येथे दाखल होत असतात. तसेच वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत याच विमानतळाचा वापर होत असतो. येथे उतरणाऱ्या फ्लाइट्सना जगातील सर्वात भीतीदायक लँडिंगच्या यादीत सामील करण्यात येते. यामुळे येथे विमान लँड करणे देखील धोकादायक असते. येथे विमानाचे उड्डाण करणारे वैमानिक अत्यंत अधिक प्रशिक्षित असतात.