यंदेखुट येथील सिग्नल खांब कोसळला
बेळगाव : शहरातील कॉलेज रोड हा महत्त्वाचा रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावरील यंदेखुट येथील सिग्नल खांब पावसामुळे कोसळल्याने वाहतूक यंत्रणा खोळंबली आहे. अचानक सिग्नल मोडून पडल्याने याचा परिणाम रहदारीवर झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. यामध्ये सिग्नल खांबाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे सिग्नल कोसळल्याने वाहतूक नियंत्रित करणे कठीण झाले आहे. पावसामुळे रहदारी पोलिसांनाही वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे अशक्य होत आहे. हा महत्त्वाचा रहदारी रस्ता असल्याने सिग्नल यंत्रणा अत्यावश्यक आहे. शहरातून उपनगरांकडे जाणारी वाहने, उपनगर व ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या वाहनांना नियंत्रित ठेवण्यास हा सिग्नल महत्त्वाचा आहे. सिग्नलअभावी वाहनधारक मर्जीप्रमाणे वाहने चालवित आहेत. यासाठी सदर ठिकाणी त्वरित सिग्नल यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
Home महत्वाची बातमी यंदेखुट येथील सिग्नल खांब कोसळला
यंदेखुट येथील सिग्नल खांब कोसळला
बेळगाव : शहरातील कॉलेज रोड हा महत्त्वाचा रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावरील यंदेखुट येथील सिग्नल खांब पावसामुळे कोसळल्याने वाहतूक यंत्रणा खोळंबली आहे. अचानक सिग्नल मोडून पडल्याने याचा परिणाम रहदारीवर झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. यामध्ये सिग्नल खांबाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे सिग्नल कोसळल्याने वाहतूक नियंत्रित करणे कठीण झाले आहे. पावसामुळे […]