मांडवीत दुचाकीस्वाराचा शोध जारीच

पणजी : गुऊवारी मांडवी पुलावर झालेल्या अपघातातील दुचाकीस्वार मांडवी नदीत पडला होता. त्याचा शोध दुसऱ्या दिवशीही लागला नाही. गुऊवारी संध्याकाळी 5 वा. च्या सुमारास दुचाकी आणि रेंट-अ-कार यांच्यात अपघात झाला होता. गुऊवारी रात्री उशिरापर्यंत तसेच शुक्रवारी दिवसभर शोध घेऊनही दुचाकीस्वार जावेद सडेकर हा सापडला नव्हता. त्याचा उशिरापर्यंत शोध सुरूच होता.   या अपघातास रेंट कारचा पर्यटक […]

मांडवीत दुचाकीस्वाराचा शोध जारीच

पणजी : गुऊवारी मांडवी पुलावर झालेल्या अपघातातील दुचाकीस्वार मांडवी नदीत पडला होता. त्याचा शोध दुसऱ्या दिवशीही लागला नाही. गुऊवारी संध्याकाळी 5 वा. च्या सुमारास दुचाकी आणि रेंट-अ-कार यांच्यात अपघात झाला होता. गुऊवारी रात्री उशिरापर्यंत तसेच शुक्रवारी दिवसभर शोध घेऊनही दुचाकीस्वार जावेद सडेकर हा सापडला नव्हता. त्याचा उशिरापर्यंत शोध सुरूच होता.   या अपघातास रेंट कारचा पर्यटक चालक पूर्णपणे जबाबदार असून त्या रेंट अ कारचा परवाना रद्द केला जाणार आहे. तसेच संबंधित रेंट अ कार एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण घेतले जाणार, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांना सांगितले. पर्यटक चालकाचा त्यांच्या राज्यातही वाहन चालक परवाना रद्द करण्याची मागणी केली जाईल. तसेच यापुढे रेंट अ कार एजन्सीसाठी कडक नियम लागू केले जाणार आहेत, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.
रेंट अ कारसाठी  नियमावली कडक करणार : मंत्री गुदिन्हो
गेल्या महिन्याभरात राज्यात रेंट अ कार पर्यटक चालकांकडून अपघात घडण्याचे प्रकार वाढले आहेत. यात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे रेंट अ कार देताना एजन्सीने पर्यटकांची पूर्ण तपासणी करावी. त्यांना राज्यातील रस्त्यांचे योग्य मार्गदर्शन करावे. रेंट अ कार देताना त्या चालकाचा परवाना तसेच जर तो मद्यपी तसेच इतर काही त्रुटी असल्यास त्यांच्या ताब्यात वाहने देऊ नये. यापुढे रेंट अ कारवाल्यासाठी कडक नियमावली लागू केली जाणार आहे. जर नियमांचे पालन केले जात नसेल तर परवाना रद्द केला जाणार असल्याचा इशारा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला आहे. पर्यटक वाढत असल्याने रेंट अ कार परवान्यासाठी वाहतूक खात्याकडे अनेक अर्ज येत आहेत. पण गेल्या तीन वर्षांपासून रेंट अ कारचा परवाना बंद केला आहे. तसेच ज्या रेंट अ कार आहेत. त्यांना पाच वर्षानंतर परवाना नूतनीकरण करावा लागतो. त्यावेळी त्यांची पूर्ण तपासणी केली जाते. ते रेंट अ कारवाल्यांकडे स्वत:ची पार्किंग जागाही नसते, त्यामुळे कुठेही कार पार्क करतात. तसेच पर्यटकांकडे गाडी देताना त्याची योग्य तपासणी करत नसल्याचे समोर आले आहे.. या एकूण सर्व प्रकाराची तपासणी होणार आहे. असे माविन गुदिन्हो म्हणाले.
वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे!
वाहतूक खात्यातर्फे नुकतीच जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या सदस्यांसोबत बैठक झाली आहे. यावेळी राज्यांत 12 अपघातप्रवणक्षेत्रे शोधली असून त्याची दुऊस्ती केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला तसे आदेशही दिले आहेत. वाहन चालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करावे. वेगाने गाडी चालवू नये. दाऊ पिऊन गाडी चालवू नये, असेही मंत्री गुदिन्हो यांनी यावेळी सूचित केले.