नवीन शैक्षणिक वर्षात दफ्तर होणार हलके
पाठ्यापुस्तकांची दोन भागात विभागणी : राज्य सरकारवर 10 कोटींचा अतिरिक्त बोजा
बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक प्रयत्न केले जात होते. परंतु, दफ्तरांचे ओझे मात्र काही केल्या कमी होत नसल्याचे मागील काही वर्षात दिसून आले. वाढत्या दफ्तरांच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत होते. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून शालेय पाठ्यापुस्तके दोन भागांमध्ये छापण्याचा निर्णय पाठ्यापुस्तक मंडळाने घेतला आहे. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पुस्तके दोन भागांमध्ये छापली जाणार असल्याने दफ्तरांचे ओझे कमी होण्यास मदत होईल. सहामाही परीक्षेपर्यंत एक पुस्तक व त्यानंतर दुसरे पुस्तक असे नियोजन करण्यात आले आहे. पाठ्यापुस्तकांची विभागणी प्रथम सत्र व द्वितीय सत्रात केल्याने पुस्तकांचे ओझे 50 टक्क्यांनी कमी होणार आहे. शैक्षणिक वर्ष 24-25 पासून या नव्या पाठ्यापुस्तकांचे वितरण विद्यार्थ्यांना केले जाणार आहे.
6 डिसेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आली. शालेय परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्य सरकारवर 10 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. परंतु, यामुळे शालेय दफ्तरांचे ओझे कमी करण्यास मदत होईल. नव्या पाठ्यापुस्तकांमुळे यापूर्वी छपाई करण्यात आलेली 27 लाख 37 हजार 551 पुस्तके मात्र वाया जाणार आहेत. 2019 मध्ये शिक्षण विभागाने दिलेल्या अहवालात दफ्तरांचे ओझे कमी करण्याचा आदेश दिला होता. बालरोगतज्ञांच्या मते दफ्तरांच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मणक्यावर परिणाम होत असून यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले होते. यामुळे पुस्तकांचे ओझे कमी करण्यात आले होते. परंतु, याचा तितकाचा उपयोग झाला नव्हता. राज्य सरकारकडून दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न होत असताना खासगी शाळा मात्र दफ्तरांच्या ओझ्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. दफ्तरांचे ओझे कमी न करता त्यामध्ये नोटबुक तसेच इतर मोठ्या वह्यांचा समावेश केला जात आहे. काही शाळांमध्ये लॉकरची व्यवस्था असून त्यात पाठ्यापुस्तके ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.
Home महत्वाची बातमी नवीन शैक्षणिक वर्षात दफ्तर होणार हलके
नवीन शैक्षणिक वर्षात दफ्तर होणार हलके
पाठ्यापुस्तकांची दोन भागात विभागणी : राज्य सरकारवर 10 कोटींचा अतिरिक्त बोजा बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक प्रयत्न केले जात होते. परंतु, दफ्तरांचे ओझे मात्र काही केल्या कमी होत नसल्याचे मागील काही वर्षात दिसून आले. वाढत्या दफ्तरांच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत होते. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून शालेय पाठ्यापुस्तके […]
