राष्ट्र विकासात युवावर्गाची भूमिका महत्त्वाची!

उपराष्ट्रपती धनखड यांचे प्रतिपादन : केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचा दीक्षांत सोहळा थाटात
बेळगाव : विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम ही भावना उराशी बाळगून आपल्या सेवेला सुरुवात करावी. वैद्यकीय पेशामध्ये मानवतेची सेवा करताना आर्थिक बाबींचा विचार न करता सेवा हेच आपले उद्दिष्ट ठेवावे. पदवी मिळाली म्हणजे शिकणे थांबते असे नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये शिक्षण घेण्याची प्रक्रिया सुरूच ठेवावी, असे विचार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मांडले. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचा 14 वा दीक्षांत सोहळा सोमवारी केएलई शताब्दी सभागृहात पार पडला. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत, केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे, डॉ. सुदेश धनखड, डॉ. एम. एस. गणाचारी यासह इतर उपस्थित होते.
उच्च शैक्षणिक पात्रता देशाची अनमोल संपत्ती
या सोहळ्यामध्ये मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर माहिती दिली. सध्या देश वेगवान प्रगती करत असून जगाचे लक्ष भारताकडे आहे. आपली वाटचाल ही शाश्वत असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. उच्च शैक्षणिक पात्रता ही देशाची संपत्ती आहे. त्यामुळे भारताच्या विकासामध्ये ही शैक्षणिक पात्रता अविभाज्य भाग बनेल, असे त्यांनी नमूद केले. 2047 मध्ये विकसित भारत होणार असून त्यामुळे अनेक बदल घडणार आहेत. यामध्ये युवावर्गाची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल. अपयशाची भीती न बाळगता स्वामी विवेकानंद यांच्या विचारांप्रमाणे ‘उठा, जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका’. तुम्ही राष्ट्राची अतुलनीय शक्ती आहात. मिळविलेल्या प्रत्येक ज्ञानाचा देशाच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोग कसा होईल, याचा विचार करा. कोरोनाच्या काळात एकमेकांना सहकार्य केल्यामुळेच भारताला कोरोनाशी सामना करणे शक्य झाले. त्यामुळे हीच बंधुत्वाची भूमिका यापुढेही ठेवावी, असे उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले. कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. देशातील एक नामांकित शिक्षण संस्था म्हणून केएलईकडे पाहिले जाते. 310 शिक्षण संस्थांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावर्षी 1739 विद्यार्थ्यांनी पदवी मिळविली आहे. तर 45 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युएसए फिलाडेल्फिया येथील थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीचे प्रमुख डॉ. रिचर्ड डेरमन यांना केएलईची मानद डॉक्टरेट देण्यात आली. डॉ. रिचर्ड यांनी केएलईचे आभार मानत आपण केएलई परिवारातीलच एक सदस्य असल्याचे सांगितले. यावेळी केएलईचे संचालक मंडळ, उद्योजक, विविध संस्थांचे पदाधिकारी, तसेच केएलई परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Home महत्वाची बातमी राष्ट्र विकासात युवावर्गाची भूमिका महत्त्वाची!
राष्ट्र विकासात युवावर्गाची भूमिका महत्त्वाची!
उपराष्ट्रपती धनखड यांचे प्रतिपादन : केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचा दीक्षांत सोहळा थाटात बेळगाव : विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम ही भावना उराशी बाळगून आपल्या सेवेला सुरुवात करावी. वैद्यकीय पेशामध्ये मानवतेची सेवा करताना आर्थिक बाबींचा विचार न करता सेवा हेच आपले उद्दिष्ट ठेवावे. पदवी मिळाली म्हणजे शिकणे थांबते असे नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये शिक्षण घेण्याची […]
