विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाचा निकाल १०० टक्के

ओटवणे प्रतिनिधी विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक समिक्षा एकनाथ गावडे ९५ %, द्वितीय क्रमांक पूर्वा उत्तम दळवी ९४.४० %, तृतीय क्रमांक गायत्री कालिदास दळवी ९२% हिने पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे विलवडे ग्रामोन्नती मंडळ (मुंबई) अध्यक्ष संभाजी दळवी, […]

विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाचा निकाल १०० टक्के

ओटवणे प्रतिनिधी
विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक समिक्षा एकनाथ गावडे ९५ %, द्वितीय क्रमांक पूर्वा उत्तम दळवी ९४.४० %, तृतीय क्रमांक गायत्री कालिदास दळवी ९२% हिने पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे विलवडे ग्रामोन्नती मंडळ (मुंबई) अध्यक्ष संभाजी दळवी, सचिव सूर्यकांत दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल सावंत मुख्याध्यापक बुध्द भूषण हेवाळकर व शिक्षक कर्मचाऱ्यांनी यांनी अभिनंदन केले आहे