बेकिनकेरे येथील लक्ष्मीदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण

26 फेब्रुवारीला मंदिराचे उद्घाटन : पाच मंगळवार पाळणुकीला प्रारंभ वार्ताहर /उचगाव बेकिनकेरे येथील लक्ष्मीदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून उद्घाटन सोहळा येत्या 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानिमित्त मंगळवार दि. 30 जानेवारी रोजी गावात वार पाळण्यात आला. या दिवशी गावातील सर्व महिला, सुवासिनींतर्फे गावांमध्ये कलश मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गावातील सर्व 18 ठिकाणी असलेल्या […]

बेकिनकेरे येथील लक्ष्मीदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण

26 फेब्रुवारीला मंदिराचे उद्घाटन : पाच मंगळवार पाळणुकीला प्रारंभ
वार्ताहर /उचगाव
बेकिनकेरे येथील लक्ष्मीदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून उद्घाटन सोहळा येत्या 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानिमित्त मंगळवार दि. 30 जानेवारी रोजी गावात वार पाळण्यात आला. या दिवशी गावातील सर्व महिला, सुवासिनींतर्फे गावांमध्ये कलश मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गावातील सर्व 18 ठिकाणी असलेल्या देवदेवतांना अभिषेक आणि शांती करण्यात आली. बेकिनकेरे येथील लक्ष्मीदेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. यानिमित्त मंगळवार दि. 30 जानेवारीपासून पुढील येणारे पाच मंगळवार हे गावात बंदोबस्त वार पाळण्याचा संकल्प लक्ष्मीदेवी जीर्णोद्धार कमिटी आणि ग्रामस्थांनी केला आहे. यानिमित्त मंगळवारी गावामध्ये महिलांनी व सर्व ग्रामस्थांनी मिळून भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली. आणि संपूर्ण गावांमध्ये 18 ठिकाणी असलेल्या देव देवतांच्या थळी जाऊन त्यांना अभिषेक, पूजा, आरती करण्याचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी गावात बंदोबस्त वार पाळण्यात आला होता. त्यामुळे गावातील सर्व ग्रामस्थ या कलश मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.