सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच एन.डी.ना आदरांजली

बेळगाव : सीमाभागातील जनतेचे नेते भाई एन. डी. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना मंगळवारी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले. कॉलेज रोड येथील समितीच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. शेतकरी, कष्टकरी वंचितांसाठी आपले जीवन जगणारे, सीमावासियांच्या प्रत्येक लढ्यात अग्रेसर राहणारे व सीमाप्रश्नासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे सीमालढ्याचे भीष्माचार्य, सीमातपस्वी, शेतकरी […]

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच एन.डी.ना आदरांजली

बेळगाव : सीमाभागातील जनतेचे नेते भाई एन. डी. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना मंगळवारी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले. कॉलेज रोड येथील समितीच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. शेतकरी, कष्टकरी वंचितांसाठी आपले जीवन जगणारे, सीमावासियांच्या प्रत्येक लढ्यात अग्रेसर राहणारे व सीमाप्रश्नासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे सीमालढ्याचे भीष्माचार्य, सीमातपस्वी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, शिक्षणतज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून भाई एन. डी. पाटील यांनी सीमाभागात काम केले आहे. सीमाप्रश्नासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरणारे आहे. यामुळे सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले. युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा पंचायत माजी सदस्य रामचंद्र मोदगेकर, अप्पासाहेब कीर्तने, युवा नेते आर. एम. चौगुले, विलास घाडी यांनी एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बी. एस. पाटील, बी. डी. मोहनगेकर, महादेव बिर्जे, एस. आर. पाटील, मेघो बिर्जे, मनोहर संताजी, अनिल पाटील, नारायण सांगावकर, निंगाप्पा मोरे, दीपक पावशे, संजय पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.