पुण्यातील महिला पोलीसाने इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याचे कारण उघडकीस आले
रविवारी पुण्याच्या आळंदी येथे रविवारी सायंकाळी 515 वाजेच्या सुमारास इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून महिला पोलीस कर्मचारी पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या त्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीला होत्या त्यांनी रविवारी सायंकाळी इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली.
त्यांना पाण्यात उडी घेताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने देखील उडी घेतली.या घटनेची माहिती मिळतातच आळंदी नगरपरिषद आणि एनडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा शोध घेतला असताना यांना अद्याप मृतदेह सापडला नाही. शोध मोहीम सुरु आहे.
महिलेने वैयक्तिक कारणामुळे हे टोकाचे पाऊल घेतल्याचे सांगितले जात आहे. आळंदी पोलीस तपास करत असून मृतदेहाचा शोध लावला जात आहे. अद्याप मृतदेह सापडला नाही.
Edited by – Priya Dixit