पुणे–पिंपरी महापालिकेत भाजप विरुद्ध अजित पवार गट लढत होणार

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले आहे. पण पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिकांमध्ये भाजप आणि अजित पवार यांची …

पुणे–पिंपरी महापालिकेत भाजप विरुद्ध अजित पवार गट लढत होणार

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले आहे. पण पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिकांमध्ये भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.

ALSO READ: पुण्यात लॉजिस्टिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक, उभारणार 550 कोटींचा लॉजिस्टिक पार्क

ते म्हणाले, पुणेआणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढणे योग्य आहे. एकत्र लढल्यावर त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. म्हणून दोन्ही पक्ष आपापल्या ताकदीवर निवडणूक लढवणार आहे. मात्र ही लढत मैत्रीपूर्ण असेल. असे ही ते म्हणाले. 

ALSO READ: अजित पवारांच्या ‘21 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश?

या वर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खूप सखोल विचार करूनच हे विधान केले असतील. गामी महापालिका निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी आपण पूर्ण ताकद लावणार असे ते म्हणाले. 

Edited By – Priya Dixit 

ALSO READ: महाराष्ट्र सरकारने सात नवीन पोलीस स्टेशन आणि अतिरिक्त वरिष्ठ पदांना मान्यता दिली

Go to Source