बेळगावपर्यंत ‘वंदे भारत’च्या विस्ताराचा प्रस्ताव फेटाळला

मंत्री एम. बी. पाटील यांची विधानपरिषदेत माहिती बेंगळूर : बेळगावपर्यंत वंदे भारत रेल्वेचा विस्तार करण्यास रेल्वे मंत्रालयाने नकार दिला आहे. पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे कारण देऊन रेल्वे खात्याने बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्पे्रसचा बेळगावपर्यंत विस्तार करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे, अशी माहिती पायाभूत सुविधा विकास मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली आहे. विधानपरिषदेत मंगळवारी प्रश्नोत्तर सत्रात काँग्रेसचे सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या […]

बेळगावपर्यंत ‘वंदे भारत’च्या विस्ताराचा प्रस्ताव फेटाळला

मंत्री एम. बी. पाटील यांची विधानपरिषदेत माहिती
बेंगळूर : बेळगावपर्यंत वंदे भारत रेल्वेचा विस्तार करण्यास रेल्वे मंत्रालयाने नकार दिला आहे. पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे कारण देऊन रेल्वे खात्याने बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्पे्रसचा बेळगावपर्यंत विस्तार करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे, अशी माहिती पायाभूत सुविधा विकास मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली आहे. विधानपरिषदेत मंगळवारी प्रश्नोत्तर सत्रात काँग्रेसचे सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या प्रश्नावर मंत्री एम. बी. पाटील यांनी उत्तर दिले. वंदे भारत एक्स्पे्रस रेल्वे योजनेचा बेळगावपर्यंत विस्तार करण्याची मागणी आहे. या उद्देशाने रेल्वे विभागाने अलीकडेच या रेल्वेची चाचणीही घेतली आहे. मात्र, आता केंद्राने पायाभूत सुविधांची कमतरता असल्याचे कारण देऊन योजनेचा विस्तार करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यावर प्रकाश हुक्केरी यांनी नाराजी व्यक्त केली. वंदे भारत एक्स्पे्रस बेळगावपर्यंत सोडण्यासाठी तातडीने कार्यवाही करा. जर बेळगावपर्यंत या रेल्वेचा विस्तार होत नसेल तर आपल्या हिश्श्यातील रेल्वे योजनांकरिता द्यावे लागणारे अनुदान राज्य सरकारने रोखावे, अशी मागणीही केली. तेव्हा एम. बी. पाटील यांनी उत्तर देताना रेल्वे खात्याकडून माहिती मागवून उत्तर देण्यात आले आहे. पायाभूत सुविधांअभावी यासंबंधीचा प्रस्ताव फेटाळला आहे, असे सांगितले.