भारतीय ज्ञानानेच पाश्चात्यांची प्रगती
अमेरिकेतील अॅडवान्स सायन्सचे डॉ.नीलेश ओक यांचा दावा : हिंदू राष्ट्र अधिवेशनाला रामनाथी फोंडा येथे प्रारंभ
फोंडा : सनातन धर्म हा शब्दप्रामाण्यावर आधारित असून ऋषिमुनींनी जे प्रत्यक्ष अनुभवले तेच शब्दप्रमाण मानले आहे. रामायण-महाभारत आदी ग्रंथांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ आहेत. अमेरिका, कॅनडा या देशातील पाचशे ते सहाशे विद्यापीठांमध्ये या ग्रंथांचे अध्ययन केले जाते. युरोपात विज्ञानाची प्रगती झाली असली तरी ते ज्ञान भारतातूनच नेण्यात आले. भारतातील समृद्ध ग्रंथांचे भाषांतर करुनच पाश्चात्यांनी आधुनिक विज्ञानामध्ये प्रगती साधली, असा दावा अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडवान्स सायन्सचे डॉ. नीलेश नीळकंठ ओक यांनी केले.
रामनाथी-फोंडा येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. ‘विश्वगुरु भारताचे बलस्थान सनातन हिंदू धर्म’ हा त्यांचा विषय होता. काल सोमवार दि. 24 पासून या अधिवेशनाला सुरुवात झाली असून देशविदेशातील साडेचारशेहून अधिक प्रतिनिधी त्यात सहभागी झाले आहेत. दि. 30 जूनपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
जगभरातील हिंदू अभ्यासकांचा सहभाग
इंडोनेशिया येथील आचार्य डॉ. धर्मयश, आफ्रिकेतील इस्कॉनचे श्रीवास दास वनचारी, महामंडलेश्वर नर्मदा शंकर पुरी महाराज, इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे स्वामी निर्गुणानंद पुरी, स्वामी अखंडानंद गुरुकुल आश्रमाचे संस्थापक महामंडलेश्वर प्रणवानंद सरस्वती, संत रामज्ञानीदास महात्यागी, संतोष देवजी महाराज, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महंत डॉ. अनिकेत शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायातील संतबीर बंडातात्या कराडकर आदी मान्यवरांचा त्यात समावेश आहे.
राष्ट्रविरोधी तुरुंगातून निवडून आले
हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे बिजभाषण झाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध असलेला खलिस्तानी नेता अमृतपाल सिंग आणि काश्मिरमध्ये अतिरेक्यांना अर्थपुरवठा करणारा रशीद इंजिनियर यांच्यासारखे देशविरोधी व फुटीरतावादी तुरुंगातून निवडणूक लढवून निवडून आले आहेत. निधर्मी लोकशाहीचा वापर करुन असे फुटीरतावादी निवडून येणे राष्ट्राला घातक आहेत.
हिंदू विचारक संघाची स्थापना
हिंदूराष्ट्र, सनातन धर्म यांना लक्ष्य करुन अनेक खोटे आरोप केले जातात. त्यामुळे हिंदूमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या आरोपांना उत्तर देण्यासाठी हिंदू विचारक संघाची स्थापना करण्यात आली आहे. डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून प्रचाराचे नेरेटिव्ह, टुलकिट,प्रसिद्धी माध्यमे आणि राजकारण्यांना धरुन केला जाणारा अपप्रचार हिंदू विचारक संघाकडून योग्य त्या पुराव्याच्या आधारे खोडून काढला जाईल, असे डॉ. पिंगळे यांनी नमूद केले.
हिंदूंचे धर्मांतरण रोखण्याची गरज
धर्मांतर रोखण्यासाठी आदिवासी भागात केल्या जाणाऱ्या कार्याची स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी आपल्या भाषणातून माहिती दिली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदूंना धर्मशिक्षण आणि नैतिकता शिकविली गेली नाही. त्याचा परिणाम म्हणून मोठ्याप्रमाणात हिंदू नास्तिक बनले आहेत. धर्मशिक्षण नसल्यानेच अनेक हिंदूंनी स्वत:हून धर्मांतर केले आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला गरीब, आदिवासीसारख्या लोकांमध्ये जाऊन मिसळणे आवश्यक आहे. तसे झाल्यास किमान पुढची पिढी धर्मांतर करण्यापासून वाचेल, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ‘हिंदू ते हिंदू व्यवसायाला प्रोत्साहन’ या विषयावर विचार मांडले. आजची लढाई ही पारंपरिक नसून आधुनिक पद्धतीची आहे. त्यात आर्थिकशस्त्र सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून निर्माण केलेल्या समांतर अर्थव्यवस्थेला प्रत्यूत्तर देण्यासाठी हिंदूत्वनिष्ठ संघटनांनी पुढाकार घेऊन ‘ओम शुद्ध प्रमाणपत्र’ हिंदू दुकानदारांना देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.त्र्यंबकेश्वर नाशिकपासून हे अभियान सुरू करण्यात आले असून हिंदू दुकानदारांना प्रसादशुद्धीसाठी हे प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले,जगद्गुरु शंकराचार्य विधुशेखर भारती स्वामी यांनी पाठविलेले संदेश यावेळी वाचण्यात आले. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी काही ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर मान्यवरांच्याहस्ते वेदमंत्राच्या घोषात दीपप्रज्वलीत करुन अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
Home महत्वाची बातमी भारतीय ज्ञानानेच पाश्चात्यांची प्रगती
भारतीय ज्ञानानेच पाश्चात्यांची प्रगती
अमेरिकेतील अॅडवान्स सायन्सचे डॉ.नीलेश ओक यांचा दावा : हिंदू राष्ट्र अधिवेशनाला रामनाथी फोंडा येथे प्रारंभ फोंडा : सनातन धर्म हा शब्दप्रामाण्यावर आधारित असून ऋषिमुनींनी जे प्रत्यक्ष अनुभवले तेच शब्दप्रमाण मानले आहे. रामायण-महाभारत आदी ग्रंथांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ आहेत. अमेरिका, कॅनडा या देशातील पाचशे ते सहाशे विद्यापीठांमध्ये या ग्रंथांचे अध्ययन केले जाते. युरोपात विज्ञानाची प्रगती झाली असली तरी ते ज्ञान भारतातूनच नेण्यात […]
