Price of eggs has increased अंडी इतकी महागली⁉️
Eggs became expensive थंडी सुरु होताच अंड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. अंड हे उष्ण असते ज्यामुळे शरीराला उष्णता मिळते. त्यासाठी थंडीत अंड्यांचे सेवन केलं जाते. अंड्याचे दर आता सात रुपयांवर गेले असून प्रतिडझन 84 रुपयांनी अंड्याची विक्री होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अंड्यांच्या किमती वाढल्या असून 30 अंड्यांच्या ट्रेसाठी 180 रुपये मोजावे लागत आहे. अंड्यांच्या किंमतीत प्रतिनग दोन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
अंड्यांचे उत्पादन घटल्याने दर वाढल्याची माहिती समोर येत आहे. उत्पादन घटले आहे आणि मागणीप्रमाणे अंडी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं डिसेंबर महिन्यात एक डझन अंड्याचा दर 96 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. करोनानंतर अंड्यांच्या मागणीतही वाढ झाली असून हिवाळ्यात सातत्याने दर वाढत आहेत.
थंडी सुरु होताच अंड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. अंड हे उष्ण असते ज्यामुळे शरीराला उष्णता मिळते. त्यासाठी थंडीत अंड्यांचे सेवन केलं जाते. अंड्याचे दर आता सात रुपयांवर गेले असून प्रतिडझन 84 रुपयांनी अंड्याची विक्री होत आहे.