अमेरिकेत आज होणार अध्यक्षीय निवडणूक डिबेट
ट्रम्प-बायडेन एकमेकांना सामोरे जाणार
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन हे दोघेजण शुक्रवारी अमेरिकेच्या 64 वर्षांच्या अध्यक्षीय वादाचा इतिहास पुढे नेत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची ही 14वी डिबेट असेल. ही डिबेट अटलांटामधील मीडिया नेटवर्क सीएनएनच्या स्टुडिओमध्ये आयोजित केली जाईल. 5 नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी सप्टेंबरमध्ये दुसरा वाद-विवाद होणार असून तो ‘एबीसी’द्वारे आयोजित केला जाईल. अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी उमेदवारांमध्ये महत्त्वाच्या मुद्यांवर वाद-विवाद (डिबेट) होतात. त्याआधारे मतदार उमेदवारांबद्दल मते ठरवत असतात. या प्रक्रियेला अध्यक्षीय वाद-विवाद असे म्हटले जाते. हे वाद-विवाद अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत खूप खास असतात. या वादात जो जिंकतो तो अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही जिंकतो, असे यापूर्वी बऱ्याचदा दिसून आले आहे.
Home महत्वाची बातमी अमेरिकेत आज होणार अध्यक्षीय निवडणूक डिबेट
अमेरिकेत आज होणार अध्यक्षीय निवडणूक डिबेट
ट्रम्प-बायडेन एकमेकांना सामोरे जाणार वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन हे दोघेजण शुक्रवारी अमेरिकेच्या 64 वर्षांच्या अध्यक्षीय वादाचा इतिहास पुढे नेत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची ही 14वी डिबेट असेल. ही डिबेट अटलांटामधील मीडिया नेटवर्क सीएनएनच्या स्टुडिओमध्ये आयोजित केली जाईल. 5 नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी सप्टेंबरमध्ये दुसरा वाद-विवाद होणार असून तो ‘एबीसी’द्वारे आयोजित केला जाईल. […]