कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्यात

बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित भव्य निकाली कुस्तीचे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान बुधवार दि. 6 रोजी आनंदवाडीच्या आखाड्यात आयोजित करण्यात आली आहे. या कुस्ती मैदानात भारत-इराण यांच्यातून प्रमुख लढती होणार आहेत. मैदानाची तयारी अंतिम टप्यात आली असून सुमारे 25 हजार कुस्तीशौकिनांची बसण्याची सोय करण्यात आली आहे. या कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती धुमाकूळ घालणाऱ्या महाराष्ट्राचा […]

कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्यात

बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित भव्य निकाली कुस्तीचे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान बुधवार दि. 6 रोजी आनंदवाडीच्या आखाड्यात आयोजित करण्यात आली आहे. या कुस्ती मैदानात भारत-इराण यांच्यातून प्रमुख लढती होणार आहेत. मैदानाची तयारी अंतिम टप्यात आली असून सुमारे 25 हजार कुस्तीशौकिनांची बसण्याची सोय करण्यात आली आहे. या कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती धुमाकूळ घालणाऱ्या महाराष्ट्राचा अस्सल मल्ल सिकंदर शेख कोल्हापूर व भारत केसरी गुरुजीत मान रोड पंजाब यांच्यात बेळगाव केसरी किताबासाठी प्रमुख लढत होणार आहे. ही कुस्ती बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी यांनी पुरस्कृत केली आहे. दुसऱ्या क्रमांकाची लढत बेळगाव मल्ल सम्राट केसरी किताबासाठी माऊली कोकाटे पुणे व महदी इराण यांच्यात लढत होणार आहे. ही कुस्ती जय भारत फौउंडेशन यांनी पुरस्कृत केली आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती दर्शन केसरी किताबासाठी महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध हादी इराण यांच्यात होणार आहे. ही कुस्ती दर्शनचे संचालक श्रीकांत देसाई व दर्शन देसाई यांनी पुरस्कृत केली आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटकाचा वाघ कार्तिक काटेची आयोजित केली आहे. या मैदानाचे खास आकर्षण म्हणजे कुस्तीचा युट्युबचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा देवा थापा नेपाळ याचीही कुस्ती प्रथमच बेळगावच्या या मैदानात घेतली आहे. त्याशिवाय लहान मोठ्या 70 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिरजे यांनी कळविले आहे.