भरकटलेल्या हणमंताला पोलीसांनी केले वडिलांच्या स्वाधीन 

वारणानगर / प्रतिनिधी कर्नाटकातील कुंभाराळ,जमखंडी येथून घराची वाट हारवत कोडोली ता. पन्हाळा येथे पोहचलेल्या कु. हणमंत भिमाप्पा कोळेकर,वय १० या बालकाच्या नातेवाइकांची शोध मोहिम कोडोली पोलीसानी राबवून अवघ्या दहा तासात हणमंत यास वडीलांच्या स्वाधिन केले. कु. हणमंत कुंटूबातून नातेवाईकाकडे तेथून तो वाट दिसेल तसा तो भरकटत चालला होता तो आज बुधवार दि. १७ रोजी सकाळी […]

भरकटलेल्या हणमंताला पोलीसांनी केले वडिलांच्या स्वाधीन 

वारणानगर / प्रतिनिधी

कर्नाटकातील कुंभाराळ,जमखंडी येथून घराची वाट हारवत कोडोली ता. पन्हाळा येथे पोहचलेल्या कु. हणमंत भिमाप्पा कोळेकर,वय १० या बालकाच्या नातेवाइकांची शोध मोहिम कोडोली पोलीसानी राबवून अवघ्या दहा तासात हणमंत यास वडीलांच्या स्वाधिन केले. कु. हणमंत कुंटूबातून नातेवाईकाकडे तेथून तो वाट दिसेल तसा तो भरकटत चालला होता तो आज बुधवार दि. १७ रोजी सकाळी कोडोली ता. पन्हाळा येथील शेतकरी धाब्याजवळील भागात फिरत घराकडे जायचे आहे बडबडत होता तो कन्नड भाषा बोलत असल्याने त्याचे म्हणने कोणालाच समजत नव्हते अखेर नागरिकानी कोडोली पोलीसांत दाखल केले स्वताचे नाव कु.हणमंत भिमाप्पा कोळेकर पत्ता आई वडील ऊस तोड मजूर असल्याचे सांगत होता.
कु.हणमंत याचा फोटो व माहिती कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यानी सोशल मीडियावर सकाळी १०.३० वा. च्या सुमारास टाकली होती तसेच हणमंत याने सांगितलेल्या माहितीवर पोलीसानी शोध मोहिम राबवत आई वडीलांना संदेश देऊन कोडोली पोलीस ठाणे येथे पाचारन करून रात्री १० वाजता हणमंतला वडीलांच्या स्वाधिक केले.