गाजलेल्या अभिनेत्रीची दयनीय अवस्था
एकेकाळी हिंदी मालिकांमध्ये गाजलेल्या टीव्ही अभिनेत्रीची आज अत्यंत दुरवस्था झाली आहे. या अभिनेत्रीचे नाव नुपूर अलंकार असे आहे. नव्वद आणि दोन हजारच्या दशकांमध्ये ती घरोघरी प्रसिद्ध होती. तिने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये सून, बहीण किंवा अन्य महत्वाच्या भूमिका गाजवलेल्या आहेत. तिने एकंदर 157 टीव्ही शोज अणि मालिकांमध्ये कामे केली असल्याची माहिती दिली जाते. तिचा घर-संसारही चांगला चाललेला होता. तथापि, एक दिवस तिने हा सर्व मानसन्मान आणि वैभव सोडण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला होता,
तिने हे सर्व झगमगते जग सोडून साध्वी बनण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार तिच्या मातापित्याची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे ती अत्यंत दु:खी झाली होती. तिचा या भौतिक जगावरचा विश्वासच उडाला होता. त्यामुळे ती संन्यासिनी बनली. तथापि, या तिच्या नव्या जीवनातही तिला समाधान मिळाले नाही. 1972 मध्ये जयपूर येथे जन्मलेल्या या अभिनेत्रीची ही शोकांतिका कोणाच्याही काळजाचा ठोका चुकवेल अशीच आहे. तिने जवळपास 25 वर्षे छोटा पडदा गाजवला. तिचा नंतर विवाहही झाला आणि ती आपल्या पतीसह सुखी होती. तथापि, 2019 मध्ये पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेतील मोठा घोटाळा उघड झाला. या बँकेत या अभिनेत्रीने बरीच मोठी रक्कम ठेव म्हणून ठेवली होती. तिने जीवनभर अभिनय करुन केलेली कमाई या बँकेत जमा केलेली होती. तथापि, ही बँक दिवाळखोर झाल्याने तिचे सारे पैसे बुडाले. तेव्हापासून तिच्यावरील संकटांच्या मालिकेचा प्रारंभ झाला. तिला आपले दागदागिने विकून गुजराण करावी लागली. नंतर तिला आपल्या परिचितांकडून कर्ज काढून स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागला. तिने तिच्या पतीपासूनही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज ही अभिनेत्री 53 वर्षांची आहे. तिला स्वत:चे असे कोणीही राहिलेले नाही. तिच्यावर अक्षरश: याचना करुन जगण्याची वेळ आलेली आहे. पैसे गुंतवण्यासंबंधीचा एक निर्णय तिने चुकीचा घेतल्याने ही वेळ तिच्यावर आलेली आहे, असे दिसून येते.
Home महत्वाची बातमी गाजलेल्या अभिनेत्रीची दयनीय अवस्था
गाजलेल्या अभिनेत्रीची दयनीय अवस्था
एकेकाळी हिंदी मालिकांमध्ये गाजलेल्या टीव्ही अभिनेत्रीची आज अत्यंत दुरवस्था झाली आहे. या अभिनेत्रीचे नाव नुपूर अलंकार असे आहे. नव्वद आणि दोन हजारच्या दशकांमध्ये ती घरोघरी प्रसिद्ध होती. तिने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये सून, बहीण किंवा अन्य महत्वाच्या भूमिका गाजवलेल्या आहेत. तिने एकंदर 157 टीव्ही शोज अणि मालिकांमध्ये कामे केली असल्याची माहिती दिली जाते. तिचा घर-संसारही […]

