मॅनहोलमध्ये पडलेल्या वृद्धाला दोघा वाहतूक पोलिसांनी वाचवले

बेळगाव : भर पावसात रात्रीच्या वेळी मॅनहोलमध्ये अडकलेल्या गणेशपूर येथील एका वृद्धाला वाहतूक पोलिसांनी वाचवले आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून वृद्धाला वाचवणाऱ्या दोन पोलिसांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात सेवा बजावणाऱ्या सिकंदर बेनकनहळ्ळी व सदाशिव मांग हे दोघे सोमवार दि. 22 जुलै रोजी रात्री 9 वाजता आपले काम […]

मॅनहोलमध्ये पडलेल्या वृद्धाला दोघा वाहतूक पोलिसांनी वाचवले

बेळगाव : भर पावसात रात्रीच्या वेळी मॅनहोलमध्ये अडकलेल्या गणेशपूर येथील एका वृद्धाला वाहतूक पोलिसांनी वाचवले आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून वृद्धाला वाचवणाऱ्या दोन पोलिसांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात सेवा बजावणाऱ्या सिकंदर बेनकनहळ्ळी व सदाशिव मांग हे दोघे सोमवार दि. 22 जुलै रोजी रात्री 9 वाजता आपले काम संपवून घरी जाण्याच्या तयारीत होते. संततधार पाऊस सुरूच होता. फुटपाथवरही पाणीच पाणी झाले होते. कॉलेज रोडवरील एक मॅनहोल उघडे होते. त्यामध्ये अडकलेल्या गणेशपूर येथील राजरतन (वय 60) हे वृद्ध पोलिसांच्या नजरेस पडले. त्यांनी तातडीने या वृद्धाला बाहेर काढून मॅनहोल बंद केले. त्याआधी मॅनहोलभोवती जमलेला कचरा काढून टाकला. सिकंदर व सदाशिव यांच्या सेवाकार्याचे पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग व उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी कौतुक केले आहे. मॅनहोल बंद करतानाचा एक व्हिडिओही आयुक्तांनी जारी केला आहे.