मतदानाची अधिकृत वेळ जाहीर; सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30, पर्यंत नागरिकांना मतदान करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकसाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत वेळ जाहीर केली असून येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी नागरिकांनी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30, पर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

ALSO READ: पुणे निवडणुकीसाठी पवार कुटुंब एकत्र आले, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला

निवडणूक प्रचारादरम्यान काही उमेदवारांकडून आणि सोशल मीडियावरील माहितीपत्रकांवर मतदानाची वेळ चुकीची सांगितली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. या साठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने अधिकृतपणे मतदानाची वेळ जाहीर केली आहे.

ALSO READ: पिंपरी चिंचवड मध्ये 12 माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

मतदानासाठी नागरिकांनी हे कागदपत्रे घेऊन जावे 

निवडणूक ओळखपत्र (Voter ID)

आधार कार्ड

पॅन कार्ड

वाहन परवाना (Driving License)

पासपोर्ट किंवा इतर अधिकृत शासकीय ओळखपत्रे

ALSO READ: महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांना धक्का, मित्रपक्ष सचिन खरात यांनी युती तोडली

महत्त्वाची नोंद: ज्या मतदान केंद्रावर किंवा ज्या प्रभागाच्या यादीत मतदाराचे नाव आहे, त्याच ठिकाणी त्याला मतदान करता येईल. मतदानापूर्वी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी.

 नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता, निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळेत मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा,” असे आवाहन करण्यात आले आहे. 

Edited By – Priya Dixit

Go to Source