विमान प्रवाशांची संख्या 30 कोटीपर्यंत पोहोचणार

2023 मध्ये 15 कोटी जणांचा विमानप्रवास: इंडिगोचा वाटा 60 टक्के वृत्तसंस्था / नवी दिल्ली विमान प्रवाशांची संख्या 30 कोटीपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केला आहे. भारत हा विमान खरेदीच्या बाबतीमध्ये अमेरिका आणि चीन नंतर तिसऱ्या नंबरचा मोठा देश आहे. 2030 पर्यंत देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या वार्षिक स्तरावर […]

विमान प्रवाशांची संख्या 30 कोटीपर्यंत पोहोचणार

2023 मध्ये 15 कोटी जणांचा विमानप्रवास: इंडिगोचा वाटा 60 टक्के
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विमान प्रवाशांची संख्या 30 कोटीपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केला आहे. भारत हा विमान खरेदीच्या बाबतीमध्ये अमेरिका आणि चीन नंतर तिसऱ्या नंबरचा मोठा देश आहे.
2030 पर्यंत देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या वार्षिक स्तरावर 30 कोटी इतकी राहू शकते. 2023 मध्ये विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या 15.20 कोटी इतकी होती. सिव्हिल एव्हिएशन कॉनक्लेव्ह प्रदर्शनामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांनी माहिती दिली आहे. पेंद्रीय मंत्री सिंधिया यांनी सांगितले की हवाई विमानतळे आणि वॉटर ड्रोमची संख्या देशामध्ये 149 वरून 200 पर्यंत वाढवली जाणार आहे. 2030 पर्यंत भारतीय विमान क्षेत्र दहा ते पंधरा टक्के विकसित राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय स्तरावर संख्या
2030 पर्यंत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या 30 कोटी इतकी होण्याची शक्यता दिसून येत आहे. मागच्या एक दशकांमध्ये पाहता देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 15 टक्के वाढली आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहता विमान प्रवाशांची संख्या 6.1 टक्के वाढीव राहिली आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये देशांतर्गत कार्गो सेवेमध्ये 60 टक्के इतकी दमदार वाढ झाली आहे.
भारत तिसरा मोठा देश
अमेरिका आणि चीन नंतर भारत हा सर्वाधिक विमान खरेदी करणारा देश राहणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. हवाई क्षेत्रातील कंपनी अकासा एअरने 200 पेक्षा अधिक विमानांची खरेदी करण्याचे ठरवले आहे. इंडिगो कंपनीने जवळपास 500 विमानांची ऑर्डर दिली असल्याचे समजते. त्याचप्रमाणे एअर इंडिया कंपनीने 470 विमानांची ऑर्डर दिली आहे, अशीही माहिती मंत्री सिंधिया यांनी दिली आहे.
2023 मध्ये 15 कोटी 20 लाख प्रवाशांनी विमानाने प्रवास केला आहे. कॅलेंडर वर्षात विमान प्रवाशांची संख्या 8 टक्के इतकी वाढली आहे. डिसेंबर 2023 मध्ये 1.37 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे.