दुसऱ्या दिवशीही हलगाजवळ कंटेनर उलटला

सुदैवानेच जीवितहानी टळली  बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या हलगा गावाजवळील सर्व्हिस रस्त्यावर दुसऱ्या दिवशीही कंटेनर पलटी झाल्याची घटना सोमवारी रात्री 10 च्या सुमाराला घडली आहे. रविवारी एक ट्रक पलटी झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा ही घटना घडली आहे. सध्या पावसाळा सुरू असून सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला वाहने घेतल्यानंतर अचानक वाहने घसरून पलटी होत आहेत. तर […]

दुसऱ्या दिवशीही हलगाजवळ कंटेनर उलटला

सुदैवानेच जीवितहानी टळली 
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या हलगा गावाजवळील सर्व्हिस रस्त्यावर दुसऱ्या दिवशीही कंटेनर पलटी झाल्याची घटना सोमवारी रात्री 10 च्या सुमाराला घडली आहे. रविवारी एक ट्रक पलटी झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा ही घटना घडली आहे. सध्या पावसाळा सुरू असून सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला वाहने घेतल्यानंतर अचानक वाहने घसरून पलटी होत आहेत. तर काही चालकांच्या बेजबाबदारपणामुळे या घटना घडू लागल्या आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली. सुदैवानेच या घटनेमध्ये जीवितहानी टळली आहे. रात्री घटना घडली तरी मंगळवारी दिवसभर हा कंटेनर रस्त्याच्या बाजूला तसाच पडून होता.
हलगा ते बस्तवाड परिसरात अपघातांच्या घटना अधिक
हलगा, बस्तवाड ही गावे राष्ट्रीय महामार्गाला लागून आहेत. या रस्त्यावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. याचवेळी या दोन्ही गावांतील वाहनधारक, दुचाकीस्वार व सायकलस्वार ये-जा करत असतात. त्यावेळी या मोठ्या वाहनांची धडक बसून अपघाताच्या घटना घडत आहेत. तेव्हा या परिसरात रहदारी पोलीस तैनात करून भरधाव वाहने चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.