मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव बदलले; आता ‘तू बोल ना या नावाने प्रदर्शित होणार

Tu Bol Na Movie : मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा चित्रपट त्याचा नावामुळे वादात सापडला होता. या नावावर काही हिंदू संघटनांनी आक्षेप केला होता. हे चित्रपट लिव्ह इन रिलेशन वर असून या चित्रपटाला संत रामदास स्वामींच्या पवित्र ग्रंथ मनाचे …

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव बदलले; आता ‘तू बोल ना या नावाने प्रदर्शित होणार

Tu Bol Na Movie : मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा चित्रपट  त्याचा नावामुळे वादात सापडला होता. या नावावर काही हिंदू संघटनांनी आक्षेप केला होता. हे चित्रपट लिव्ह इन रिलेशन वर असून या चित्रपटाला संत रामदास स्वामींच्या पवित्र ग्रंथ मनाचे श्लोक या नावावरुन दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. हे नाव दिल्यामुळे हे स्वामी रामदास स्वामींचे अपमान केल्याचं  हिंदू संघटनांचे म्हणणे होते.  हे नाव देऊन लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार केली जात होती.   

ALSO READ: बॉलिवूडनंतर प्राजक्ता कोळीने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, चित्रपटाचे पोस्टर रिलीज

या संघटनांनी पुण्यात या चित्रपटाचे काही शो बंद पाडले तसेच या चित्रपटाचे नाव बदलण्याचे म्हटले. नाव बदलले नाही तर शो बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला होता. आता या पार्शवभूमीवरून या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. मृण्मयी देशपांडे अभिनित चित्रपट मनाचे श्लोकचे नाव आता बदलून “तू बोल ना” असे ठेवण्यात आलं आहे. 

ALSO READ: गौतमी पाटीलच नवीन सॉंग दिसला ग बाई दिसला प्रेक्षकांच्या भेटीला

आधी हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला असून त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आले असून नवे नाव आणि चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली जाईल असे सांगण्यात आले.

आता हा चित्रपट नव्या नावाने ” तू बोल ना ” संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 16 ऑक्टोबर म्हणजे उद्या गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

Edited By – Priya Dixit  

ALSO READ: लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला, ३ जण गंभीर जखमी