मनपा आयुक्त पुन्हा उतरले रस्त्यावर
शहरात विविध ठिकाणी पाहणी : कचऱ्याची उचल वेळेत करण्याची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : सध्या शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया यासह इतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी पुन्हा एकदा महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे रस्त्यावर उतरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कचऱ्याची उचल वेळेत करावी, याचबरोबर शहरातील विविध भागांमध्ये औषधांची फवारणी करावी, अशी सूचना केली आहे. पहाटे सदाशिवनगर येथील वाहन गोडावूनला भेट दिली. त्यानंतर महांतेशनगर, वीरभद्रनगर येथील विभागीय कार्यालयांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. अशोकनगर जलतरण तलाव येथे पाहणी करून तेथील साफसफाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. किल्ला तलाव येथेही भेट देऊन स्वच्छता करण्याची ठेकेदाराला सूचना केली. त्यानंतर थेट त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार पेठ, नरगुंदकर भावे चौक, तसेच भाजी मार्केटला भेट दिली.
तेथील खराब असलेले रस्ते पाहून आयुक्त चांगलेच संतापले. त्यांनी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची सूचना केली आहे. रस्त्याच्या मधेच मोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचून आहे. पाणी साचून राहिल्यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. तेव्हा ते खड्डे बुजवून दुरुस्ती करावी, असे त्यांनी सांगितले. बॉक्साईट रोड परिसरात आयुक्तांनी भेट दिली. त्याठिकाणी असलेल्या जलतरण तलावातील पाणी वरचेवर काढावे, जलतरण तलाव स्वच्छ करावा, पाण्याचा साठा जास्त दिवस करू नये, अशी सक्त ताकीद केली आहे. यासह शहरातील सर्व प्रभागांमध्ये मलेरिया प्रतिबंधक औषध फवारणी फॉगिंग यंत्राद्वारे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत बेजबाबदारपणा दाखवू नका, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. यावेळी महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण विभागाचे अभियंता हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
भरपावसातच पाहणी दौरा
पहाटे पावसाची रिपरिप सुरूच होती. तरीदेखील महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, अभियंता हणमंत कलादगी यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत. सध्या शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा पाहणीदौरा केला आहे. भरपावसात छत्री घेऊनच सारेजण रस्त्यावर उतरले होते. यामुळे प्रभागाच्या निरीक्षकांनाही त्या ठिकाणी हजर रहावे लागले.
Home महत्वाची बातमी मनपा आयुक्त पुन्हा उतरले रस्त्यावर
मनपा आयुक्त पुन्हा उतरले रस्त्यावर
शहरात विविध ठिकाणी पाहणी : कचऱ्याची उचल वेळेत करण्याची अधिकाऱ्यांना सूचना बेळगाव : सध्या शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया यासह इतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी पुन्हा एकदा महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे रस्त्यावर उतरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कचऱ्याची उचल वेळेत करावी, याचबरोबर शहरातील विविध भागांमध्ये औषधांची फवारणी करावी, अशी सूचना केली आहे. पहाटे सदाशिवनगर येथील वाहन गोडावूनला […]