लोकसभेत ‘महा’गोंधळ सुरूच
सभापतींकडून ताकीद : कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेतील कामकाज शुक्रवारीही गोंधळाने सुरू झाले. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी सदस्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये पोस्टर फडकावत गर्दी केली. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने ‘जर तुम्हाला कामकाजात वारंवार जाणुनबुजून अडथळे निर्माण करायचे असतील आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेचा अवमान करायचा असेल, तर मी असे फार काळ चालवू देणार नाही.’ अशी स्पष्ट ताकीद देत कामकाज तहकूब करण्यात आले. सोमवारीही परिस्थिती अशीच राहिली तर अर्थसंकल्पीय चर्चा आणि महत्त्वाची विधेयके मंजूर होण्यास विलंब होऊ शकतो.
लोकसभा अध्यक्षांनी दुसऱ्या बाजूने कोणत्याही चर्चेत सहभागी होण्यास सदस्यांना सक्त मनाई केली. त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली. दरम्यान, राज्यसभेतील कामकाज आज शांततेत सुरू झाले होते. राज्यसभेत शून्य तासादरम्यान सदस्य जनहिताचे मुद्दे उपस्थित करून चर्चा करताना दिसून आले. राज्यसभेत अनेक सदस्यांनी विविध विषयांवर खासगी विधेयके सादर केली. त्यानंतर काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी सभागृहाच्या संमतीने सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. उपसभापती हरिवंश यांनी या विषयावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांचे मत मागितले. किरण रिजिजू यांनीही जयराम रमेश यांच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. त्यानंतर, उपसभापतींनी सभागृहाच्या संमतीने 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली.
गोंधळाची मुख्य कारणे
लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी विविध मुद्यांवर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत सभापतींनी केलेल्या मागील विधानासारख्या आणि महागाई आणि बेरोजगारीसारख्या मुद्यांवर चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये धडक दिली. गोंधळ आणि फलकांच्या प्रदर्शनामुळे सभागृहात कोणतेही कायदेविषयक काम पूर्ण होऊ शकले नाही.
सभापतींची नाराजी, सुरक्षेचा मुद्दा
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या शिष्टाचाराचा हवाला देत गदारोळावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृह चर्चेसाठी आहे, व्यत्यय आणण्यासाठी नाही, असे त्यांनी बजावले. दोन दिवसांपूर्वीच अधिवेशनात सभापतींनी पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत संबंधित माहिती मिळाल्याचे उघड केले होते, त्यानंतर सभागृहातील वातावरण तणावपूर्ण राहिले होते.
Home महत्वाची बातमी लोकसभेत ‘महा’गोंधळ सुरूच
लोकसभेत ‘महा’गोंधळ सुरूच
सभापतींकडून ताकीद : कामकाज सोमवारपर्यंत तहकूब वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभेतील कामकाज शुक्रवारीही गोंधळाने सुरू झाले. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी सदस्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये पोस्टर फडकावत गर्दी केली. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने ‘जर तुम्हाला कामकाजात वारंवार जाणुनबुजून अडथळे निर्माण करायचे असतील आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेचा अवमान […]
