तान्हुल्या बहिणीसह शाळेत पोहोचली चिमुरडी
बहिणीला दिली दूधाची बाटली, दुसरीकडे केला अभ्यास
मानवी नात्यांपेक्षा काहीच महत्त्वाचे नसते असे बोलले जाते. मानवी नाते समजता येत नसतील किंवा त्याबद्दलचे स्वत:चे कर्तव्य पार पाडता येत नसेल तर साक्षरतेचा काहीच लाभ नसतो. काही लोकांना ही गोष्ट प्रौढ झाल्यावरही उमगत नाही, तर काही जण लहान वयातच ही गोष्ट जाणतात. सध्या एका मुलीची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्वत: शाळेत जाण्याचे आणि खेळण्या-बागडण्याचे वय असताना या मुलीने स्वत:ची जबाबदारी ओळखली आणि तान्हुल्या बहिणीला उचलून घेत शाळेत पोहोचली. या मुलीला स्वत:चे शिक्षण सोडायचे नव्हते आणि तसेच स्वत:च्या बहिणीला एकटे सोडायचे नव्हते. वर्गात बहिणीला कडेवर घेत शिकतानाचे तिचे छायाचित्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केवळ आईच स्वत:च्या मुलांसाठी सर्व प्रकारचा त्याग करण्यास तयार असते असे बोलले जाते. परंतु थायलंडच्या प्राचिन बरी प्रांतात राहणारी एक चिमुरडी स्वत:च्या बहिणीला कडेवर घेत शाळेत पोहोचली. तिची आई कामासाठी बाहेर गेली होती तर दुसरीकडे तिला शाळेत जायचे होते. अशा स्थितीत तिने शाळेत जाणे सोडण्याऐवजी बहिणीला सोबत नेत शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. शाळेत पोहोचल्यावर तिने बहिणीला दूधाची बाटली देत तिला थोपटवत स्वत: मात्र नोट्स तयार करत राहिली.
बहिण देखील आईच असते..
शिक्षिकेने या मुलीच्या कडेवर बाळ पाहिल्यावर तिला ओरडण्याऐवजी तिचे कौतुकच केले. तिने शाळा चुकविली नाही हे चांगलीच गोष्ट असल्याचे शिक्षिकेने म्हटले आहे. सोशल मीडिया युजर्स या मुलीचे कौतुक करत आहे. मुलगी समजंस असण्यासोबत शिक्षणावरून आग्रही देखील आहे. छोट्या बहिणीला एक रोल मॉडेल मिळाल्याचे काही युजर्सनी नमूद केले आहे.
Home महत्वाची बातमी तान्हुल्या बहिणीसह शाळेत पोहोचली चिमुरडी
तान्हुल्या बहिणीसह शाळेत पोहोचली चिमुरडी
बहिणीला दिली दूधाची बाटली, दुसरीकडे केला अभ्यास मानवी नात्यांपेक्षा काहीच महत्त्वाचे नसते असे बोलले जाते. मानवी नाते समजता येत नसतील किंवा त्याबद्दलचे स्वत:चे कर्तव्य पार पाडता येत नसेल तर साक्षरतेचा काहीच लाभ नसतो. काही लोकांना ही गोष्ट प्रौढ झाल्यावरही उमगत नाही, तर काही जण लहान वयातच ही गोष्ट जाणतात. सध्या एका मुलीची कहाणी सध्या सोशल […]