भंडाऱ्याच्या उधळणीत केदनूर महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ
हजारो भाविकांची उपस्थिती : यात्रा 4 मार्चपर्यंत सुरू, अक्षतारोपण उत्साहात
वार्ताहर /कडोली
भंडाऱ्याच्या उधळणीत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत केदनूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. बुधवारी सूर्योदयाला सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत अक्षतारोपण करण्यात आल्या. त्यानंतर सकाळी 9 वाजता केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, गावचे सुपुत्र व सैनिक गोपाळराव संभाजी, ग्रा. पं. अध्यक्षा सविता संभाजी, उपाध्यक्षा लक्ष्मी बेळगावी, शिवनगौडा पाटील, देवस्थान पंच कमिटी शांताराम काकतकर, हक्कदार, ग्रा. पं. सदस्य यांच्या उपस्थितीत श्री महालक्ष्मी देवीच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. ढोल-ताशाच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत गावभर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शिक्षक मारुती अजाणी यांनी केले. प्रत्येक तीन वर्षांनी या श्री महालक्ष्मी देवीची (बचनट्टी) यात्रा होत असते. परंतु प्रत्येकवेळी जितका उत्साह भाविकांत असतो तितका उत्साह यावेळी कार्यकर्ते व भाविकांमध्ये दिसून येत नव्हता. यावेळी या यात्रेचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे चिरंजीव राहुल जारकीहोळी यांनी मिरवणुकीत येऊन देवीची पूजा केली. संपूर्ण गावभर मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी गदगेवर श्री महलक्ष्मी देवीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर विधीवत पूजा करण्यात आली. यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी ग्रा. पं., देवस्थान पंचकमिटी आणि पोलीस खात्यातर्फे विशेष लक्ष ठेवले जात आहे. यात्रा 4 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
Home महत्वाची बातमी भंडाऱ्याच्या उधळणीत केदनूर महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ
भंडाऱ्याच्या उधळणीत केदनूर महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ
हजारो भाविकांची उपस्थिती : यात्रा 4 मार्चपर्यंत सुरू, अक्षतारोपण उत्साहात वार्ताहर /कडोली भंडाऱ्याच्या उधळणीत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत केदनूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. बुधवारी सूर्योदयाला सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत अक्षतारोपण करण्यात आल्या. त्यानंतर सकाळी 9 वाजता केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, गावचे सुपुत्र व सैनिक गोपाळराव संभाजी, ग्रा. पं. […]