‘स्मार्ट सिटी’ कामांची पाहणीसाठी न्यायाधीश उतरणार पणजी रस्त्यांवर

पणजी : अनियोजित स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे पणजी शहरातील वाहतूक व्यवस्था, रस्ता सुरक्षा आणि धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आखलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षरित्या पाहणी करण्यासाठी येत्या 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबई  उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. वाल्मिकी मिनेझिस आणि न्या. महेश सोनक पणजीत येणार असल्याचे  काल बुधवारी सुनावणी दरम्यान नमूद केले. यामुळे ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांची धाबे […]

‘स्मार्ट सिटी’ कामांची पाहणीसाठी न्यायाधीश उतरणार पणजी रस्त्यांवर

पणजी : अनियोजित स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे पणजी शहरातील वाहतूक व्यवस्था, रस्ता सुरक्षा आणि धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आखलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षरित्या पाहणी करण्यासाठी येत्या 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबई  उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. वाल्मिकी मिनेझिस आणि न्या. महेश सोनक पणजीत येणार असल्याचे  काल बुधवारी सुनावणी दरम्यान नमूद केले. यामुळे ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांची धाबे दणाणले आहेत. अनियंत्रित आणि मनमानी ’स्मार्ट सिटी’च्या कामामुळे वैतागलेल्या पणजीवासियांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या दोन जनहित याचिका मंगळवारी एकत्रित सुनावणीला आल्या. यावेळी झालेल्या सुनावणीच्या वेळी सरकारतर्फे बाजू मांडणाऱ्या अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी बुधवारी धूळ प्रदूषण रोखण्यासाठी, वाहतूक व्यवस्था आणि रस्ता सुरक्षेबाबत उपाययोजना आराखड्याद्वारे न्यायालयासमोर मांडल्या. पणजीत धुळीचे आणि आवाजाचे प्रदूषण वाढले असल्याने त्रासलेल्या  पणजीवासियांतर्फे पियुष पांचाळ, अल्वनि डिसा, नीलम नावेलकर तसेच ख्रिस्टस लोपेझ आणि सदानंद वायंगणकर आदींनी उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र जनहित याचिका दाखल केल्या आहेत. गोवा खंडपीठाने ‘स्मार्ट सिटी’च्या अनियंत्रित  कामांमुळे पणजीत वाढत्या धुळीमुळे नागरिकांना, खास करून वृद्ध आणि आजारी माणसांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यावर उपाय करण्यास सुचवल्यावर ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांना जाग आली. बुधवारी पणजीत जागोजागी धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पाण्याच्या टँकरमधून फवारणी हाती घेण्यात आली. अनेक ठिकाणी ख•s बुजवण्यात आले असून बॅरिकेड्स घालण्यात आले आहेत. त्यामुळे पणजी रहिवाशांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.