अनगोळमधील ‘जय महाराष्ट्र चौक’ फलक हटवला
मनपा अधिकाऱ्यांनी केली कारवाई : मराठी भाषिकांतून संतप्त प्रतिक्रिया
बेळगाव : अनगोळ येथील ‘जय महाराष्ट्र चौक’ हा नामफलक अखेर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमक्ष कर्मचाऱ्यांनी गुऊवारी रात्री हटविला. याबाबत मराठी भाषिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनगोळ-भांदूर गल्ली क्रॉस येथे युवक मंडळाच्या वार्ताफलकावर असलेला ‘जय महाराष्ट्र’ फलक आणि या चौकाला असलेले नाव कन्नड संघटनेच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने हटविले. यावेळी मनपा अधिकाऱ्यांसोबत टिळकवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारीही उपस्थित होते. महानगरपालिके समोर कन्नड संघटनेच्या मुठभर कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा फलक हटविण्यात आला आहे. अनगोळ गावात गेल्या कित्येक वर्षांपासून हा जय महाराष्ट्र चौक म्हणून अस्तित्वात आहे. अनगोळ येथील नागरिकही या चौकाला ‘जय महाराष्ट्र चौक’ म्हणूनच ओळखतात. तर येथील रहिवासीही आपला पत्ता जय महाराष्ट्र चौक, घर नंबर वगैरे सांगतात. कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या फलकाबाबत आक्षेप घेतला होता. गेल्या काही वर्षांपासून या फलकाच्या नावावरून सोशल मीडियावर कन्नड संघटनेचे कार्यकर्ते उलटसुलट चर्चा उपस्थित करीत होते.
Home महत्वाची बातमी अनगोळमधील ‘जय महाराष्ट्र चौक’ फलक हटवला
अनगोळमधील ‘जय महाराष्ट्र चौक’ फलक हटवला
मनपा अधिकाऱ्यांनी केली कारवाई : मराठी भाषिकांतून संतप्त प्रतिक्रिया बेळगाव : अनगोळ येथील ‘जय महाराष्ट्र चौक’ हा नामफलक अखेर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमक्ष कर्मचाऱ्यांनी गुऊवारी रात्री हटविला. याबाबत मराठी भाषिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनगोळ-भांदूर गल्ली क्रॉस येथे युवक मंडळाच्या वार्ताफलकावर असलेला ‘जय महाराष्ट्र’ फलक आणि या चौकाला असलेले नाव कन्नड संघटनेच्या दबावाखाली येऊन […]