‘डायलिसिस’वरील रुग्णवाढ चिंताजनक
राज्यातील डायलिसिस केंद्रे फुल्ल: प्रत्येक दिवशी दोन रुग्णांची पडते भर
पणजी : राज्यात गेल्या 20 वर्षांत फक्त गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘डायलिसिस’ केले जात होते. परंतु आता बाराही तालुक्यांतील आरोग्य केंद्रात हे उपचार सुरू केले असून राज्यातील बाराही तालुक्यांतील डायलिसिस केंद्रे ‘फुल्ल’ झाली आहेत. डायलिसिस ऊग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून प्रत्येक दिवसाला 1 ते 2 ऊग्ण डायलिसिससाठी येत आहेत, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या युगात लोक आरोग्याला प्राधान्य देत नाहीत. आपल्या दैनंदिन जीवनात आपण कितीही व्यस्त असलो तरी प्राधान्याने वेळ काढून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
मानसिक आजारांमुळे अन्य आजार
आज अनेक आजार मानसिक आरोग्य ठिक नसल्यानेच होत आहेत. भारत हा जगातील सर्वात जास्त मधुमेह ऊग्ण असलेला देश म्हणून ओळखला जात आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब या दोन प्रमुख समस्या देशात तसेच आपल्या राज्यातही झपाट्याने वाढत आहे.
दररोज योग आत्मसात करा
निरोगी आरोग्यासाठी आवश्यक ती सगळी काळजी घेणे अपेक्षित आहे. कालच जागतिक योग दिवस आपण साजरा केला. फक्त एका दिवसासाठी योग न करता, निरोगी आरोग्यासाठी दररोज योग आत्मसात करा असा संदेश देखील मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला आहे.
संतुलीत आहार, विहार असावा
मधुमेह होऊ नये, तसेच झाल्यास तो नियंत्रित राहण्यासाठी रुग्णांनी आवश्यक असलेली जीवनशैली आत्मसात करायला हवी. खाण्यापिण्यात योग्य ते बदल करुन नियंत्रित आहार घ्यायला हवा. निसर्गाच्या सानिध्यातही वेळ घालवायला हवी. मन प्रसन्न राहील यासाठी योग, ध्यानधारणा या सारखे नैसर्गिक उपाय अंमलात आणावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे आहे.
Home महत्वाची बातमी ‘डायलिसिस’वरील रुग्णवाढ चिंताजनक
‘डायलिसिस’वरील रुग्णवाढ चिंताजनक
राज्यातील डायलिसिस केंद्रे फुल्ल: प्रत्येक दिवशी दोन रुग्णांची पडते भर पणजी : राज्यात गेल्या 20 वर्षांत फक्त गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘डायलिसिस’ केले जात होते. परंतु आता बाराही तालुक्यांतील आरोग्य केंद्रात हे उपचार सुरू केले असून राज्यातील बाराही तालुक्यांतील डायलिसिस केंद्रे ‘फुल्ल’ झाली आहेत. डायलिसिस ऊग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून प्रत्येक दिवसाला 1 ते 2 ऊग्ण डायलिसिससाठी येत आहेत, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद […]