गर्भगृहात विराजमान होणारी रामलल्लाची मूर्ती निश्चित
म्हैसूरच्या प्रसिद्ध मूर्तीकाराकडून निर्मिती : 5 वर्षांच्या बालस्वरुपात असणार मूर्ती
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात प्रतिष्ठापित होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची रविवारी निवड करण्यात आली आहे. 29 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी 3 मूर्तींसंबंधीचे स्वत:चे मत लेखी स्वरुपात महासचिव चंपत राय यांना सोपविले होते. गर्भगृहात रामलल्लाची 51 इंच उंचीची मूर्ती विराजमान होणार असून यात रामलल्ला हे 5 वर्षांच्या बाल स्वरुपात असतील, असे राय यांनी सांगितले आहे.
गर्भगृहात रामलल्लांची उभी मूर्ती प्रतिष्ठापित होणार आहे. रामलल्लांची ही मूर्ती कमळाच्या फुलावर विराजमान असणार आहे. अद्याप या मूर्तीचे छायाचित्र जारी करण्यात आलेले नाही. म्हैसूरचे प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. रामलल्लाच्या तीन मूर्तींची निर्मिती गणेश भट्ट, योगीराज आणि सत्यनारायण पांडे यांनी तीन वेगवेगळ्या शिळांपासून केली होती. यातील सत्यनारायण पांडे यांची मूर्ती श्वेत संगरमरची आहे. तर उर्वरित देन्ही मूर्ती या कर्नाटकातील निळ्या शिळेतून साकारण्यात आल्या आहेत. यात गणेश भट्ट यांची मूर्ती दाक्षिणात्य शैलीत तयार करण्यात आली होती. यामुळे अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे.
रामलल्लाची मूर्ती तयार करणारे 37 वर्षीय अरुण योगीराज हे म्हैसूरचे आहेत. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या मूर्तिकलेचे कौतुक केले आहे. योगीराज यांनी जगद्गुरु शंकराचार्य यांच्या भव्य पुतळ्याची निर्मिती केली होती. हा पुतळा केदारनाथमध्ये स्थापित करण्यात आला आहे.
अयोध्येत राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत मूर्तीच्या निवडीवरून ट्रस्ट सदस्यांनी चंपत राय आणि महंत नृत्य गोपालदास यांना अंतिम अधिकार देत स्वत:चे मत सोपविले होते निवड करण्यापूर्वी ट्रस्टच्या सदस्यांनी रामलल्लाच्या तिन्ही मूर्तींचे जवळून निरीक्षण पेले होते.
मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या नव्या मूर्तीसह जुनी मूर्ती देखील प्रतिष्ठापित केली जाणार आहे. नव्या मूर्तीला अचल मूर्ती संबोधिण्यात येणार आहे. तर जुनी मूर्ती उत्सव मूर्ती म्हणून ओळखण्यात येणार आहे. भगवान श्रीरामाशी निगडित सर्व उत्सवांमध्ये उत्सव मूर्ती विराजमान केली जाणार आहे. तर नवी मूर्ती गर्भगृहात भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून विराजमान असणार आहे.
31 वर्षांनी बदलणार दर्शनाचे नियम
प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवसापासून (23 जानेवारी) रामलल्लाच्या दर्शनाचा 31 वर्षे ज्gना म्हणजे 1992 पासूनचा नियम देखील बदलणार आहे. भक्त स्वत:च्या आराध्य देवतेच्या दर्शनासाठी अनवाणी जाऊ शकणार आहेत. 6 डिसेंबर 1992 रोजी रामलल्ला हे तंबूत विराजमान झाले होते, तेव्हापासून भाविक पादत्राणे परिधान करूनच रामलल्लाचे दूरवरून दर्शन घेत होते. भाविक एका प्रवेशद्वारातून आत यायचे आणि दुसऱ्या प्रवेशद्वारातून बाहेर पडत होते. हा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आला होता.
एक दिया राम के नाम
1 जानेवारीपासून एक दिया राम के नाम ही मोहीम चालविली जाणार आहे. ही मोहीम 100 दिवस चालविली जाणार आहे. एक दिया राम के नाम ही मोहीम देशभरात चालविली जाणार आहे. तर प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी अनुष्ठान आणि पूजा एक आठवडा अगोदर म्हणजेच 16 जानेवारीपासून सुरू केली जाणार आहे. गणेश शास्त्राr द्रविड आणि लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पुजारी असणार आहेत.
Home महत्वाची बातमी गर्भगृहात विराजमान होणारी रामलल्लाची मूर्ती निश्चित
गर्भगृहात विराजमान होणारी रामलल्लाची मूर्ती निश्चित
म्हैसूरच्या प्रसिद्ध मूर्तीकाराकडून निर्मिती : 5 वर्षांच्या बालस्वरुपात असणार मूर्ती वृत्तसंस्था/ अयोध्या अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात प्रतिष्ठापित होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची रविवारी निवड करण्यात आली आहे. 29 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी 3 मूर्तींसंबंधीचे स्वत:चे मत लेखी स्वरुपात महासचिव चंपत राय यांना सोपविले होते. गर्भगृहात रामलल्लाची 51 इंच उंचीची मूर्ती विराजमान […]