पतीला दिले जाते पायाने खाणे

भारत हा विविधतेने भरलेला देश आहे. येथे प्रत्येक कोसावर पाणी वेगळे असते आणि प्रत्येक चार कोसांवर भाषा वेगळी होते, असे बोलले जाते. भिन्न भिन्न चालीरीतींचे अनेक समाज या देशात एकत्र नांदत असल्याने ही विविधता निर्माण झाली आहे. काही समाजांमधील चालीरितीतर अत्यंत अद्भुत असतात. अशीच एक वनवासी जमात असून तिचे नाव ‘थारु’ असे आहे. ही हिंदू […]

पतीला दिले जाते पायाने खाणे

भारत हा विविधतेने भरलेला देश आहे. येथे प्रत्येक कोसावर पाणी वेगळे असते आणि प्रत्येक चार कोसांवर भाषा वेगळी होते, असे बोलले जाते. भिन्न भिन्न चालीरीतींचे अनेक समाज या देशात एकत्र नांदत असल्याने ही विविधता निर्माण झाली आहे. काही समाजांमधील चालीरितीतर अत्यंत अद्भुत असतात.
अशीच एक वनवासी जमात असून तिचे नाव ‘थारु’ असे आहे. ही हिंदू धर्म मानणारी जमात असून हिंदूंचे सर्व महत्वाचे सण या जमातीकडून साजरे केले जातात. या जमातीत हिंदू प्रथेप्रमाणेच विवाहही साजरे केले जातात. तथापि, या जमातीत अशा काही प्रथा आहेत की त्या अन्य जमातींमध्ये सहसा आढळत नाहीत. काही पत्रकारांनी आणि तज्ञांनी या जमातीचा विशेष अभ्यास केला आहे. या अभ्यासकांनी या जमातीची अनेक वेगळी वैशिष्ट्यो जगासमोर आणली आहेत.
ही जमात बिहारच्या चंपारण्य, उत्तराखंडमधील नैनिताल आणि उधमसिंग नगर, तसेच उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी या तीन स्थानी प्रामुख्याने दिसून येते. नेपाळमध्येही या जमातीच्या लोकांची संख्या 6 टक्क्यांहून अधिक असल्याचे बोलले जाते. या जमातीत एक प्रथा अशी आहे, की वधू जेव्हा प्रथम सासरी येते आणि स्वयंपाक करते, तेव्हा पतीला भोजनाचे ताट हाताने न देता पायाने सरकवून त्याच्यासमोर आणते. त्यानंतर पतीही ते ताट आपल्या डोक्यावर घेऊन हाताने त्यातील अन्नाचे घास आपल्या तोंडात घालतो. अशा प्रकारची प्रथा अन्य कोणत्याही पुरातन जमातींमध्ये आढळत नाही, असे तज्ञांचे मत आहे. अशा प्रकारे नव्या नवरीने शिजवलेले पहिले जेवण जेवण्यासाठी नवऱ्याला चांगलीच कसरत करावी लागते. हा भोजन सोहळा पाहण्यासाठी नातेवाईकही जमतात.