गणपत गल्लीत अडकली शववाहिका

व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे नेहमीचीच समस्या बेळगाव : नेहमी गजबजलेल्या गणपत गल्लीमध्ये शववाहिका अडकून पडल्याची घटना शनिवारी घडली आहे. व्यावसायिकांनी तसेच फेरीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असून तातडीने या परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे. गणपत गल्ली परिसरातील एका व्यक्तीचे निधन झाले होते. त्याचे शव आणण्यासाठी हर्ष वाहन जात होते. यावेळी रस्त्याच्या […]

गणपत गल्लीत अडकली शववाहिका

व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे नेहमीचीच समस्या
बेळगाव : नेहमी गजबजलेल्या गणपत गल्लीमध्ये शववाहिका अडकून पडल्याची घटना शनिवारी घडली आहे. व्यावसायिकांनी तसेच फेरीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असून तातडीने या परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे. गणपत गल्ली परिसरातील एका व्यक्तीचे निधन झाले होते. त्याचे शव आणण्यासाठी हर्ष वाहन जात होते. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक तसेच रस्त्यावरच काही व्यावसायिकांनी ठाण मांडले होते. त्यामुळे वाहने ये-जा करणे अवघड जात असते. हर्ष वाहनलाही जागा दिली नाही. त्यामुळे नागकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा महानगरपालिका आणि रहदारी पोलिसांनी याकडे लक्ष देवून रस्त्यावर ठाण मांडून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.