शेतकरी कर्जमाफी वर सरकार 1 जुलै पर्यंत योजना जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान
विधानसभेचे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांकडून मांडण्यात आला या वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्प्ष्टपणे मांडली.
ALSO READ: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेडगेवार स्मारक मंदिरात पोहोचले, अजित पवारांनी अंतर ठेवले
ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वचनावर कायम आहे. अतिवृष्टीमुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर अतिरिक्त ताण जरी आला असला तरीही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांनाच मिळो बँकांना फायदा मिळू नये या साठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
ALSO READ: मुंबई महाराष्ट्राचीच राहिल, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2017 आणि 2020 मध्ये कर्जमाफी देऊनही शेतकरी पुन्हा कर्जमाफीची मागणी करत असल्याकडे लक्ष वेधत फडणवीस म्हणाले की, ही परिस्थिती चिंताजनक आहे. यावरून केवळ कर्जमाफी पुरेशी ठरत नसल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दीर्घकालीन आणि टप्प्याटप्प्याने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून कर्जमाफीचा विचार केला जात आहे.
शेतकरी कर्जमाफीची सविस्तर योजना 1 जुलै पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Edited By – Priya Dixit
ALSO READ: महाज्योती शिष्यवृत्तीची 126 कोटी रुपयांची थकबाकी देण्याची भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाची मागणी करत निदर्शने
