बेळगावात अवतरणार नाटकांचा सुवर्णकाळ

19 रोजी ‘सारखं काही तरी होतंय‘ नाटकाचे आयोजन बेळगाव : बेळगावची भूमी बहुरत्नप्रसवा आहे. अनेक नामवंत कलावंत, उद्योजक, साहित्यिक आदींनी या नगरीचे नाव उंचावले आहे. नाटकांच्या बाबतीत तर बेळगावची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. बेळगावच्या चोखंदळ रसिकांची पावती मिळणे कलाकारांसाठी अप्रूपच. बालगंधर्वांपासून ते शिलेदार कंपनीपर्यंत अनेकांनी रसिकांना मनसोक्त डुंबवले आहे. बेळगावातल्या नाट्या कलाकारांनी दिल्लीत धडक मारून […]

बेळगावात अवतरणार नाटकांचा सुवर्णकाळ

19 रोजी ‘सारखं काही तरी होतंय‘ नाटकाचे आयोजन
बेळगाव : बेळगावची भूमी बहुरत्नप्रसवा आहे. अनेक नामवंत कलावंत, उद्योजक, साहित्यिक आदींनी या नगरीचे नाव उंचावले आहे. नाटकांच्या बाबतीत तर बेळगावची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. बेळगावच्या चोखंदळ रसिकांची पावती मिळणे कलाकारांसाठी अप्रूपच. बालगंधर्वांपासून ते शिलेदार कंपनीपर्यंत अनेकांनी रसिकांना मनसोक्त डुंबवले आहे. बेळगावातल्या नाट्या कलाकारांनी दिल्लीत धडक मारून स्पर्धांतून भाग घेत अनेक पारितोषिके मिळवली आहेत. परंतु गेल्या काही कालखंडात बेळगावकर रसिक अस्सल मराठी नाटकांपासून वंचित राहिले आहेत. पण आता ही नाट्यातृषा भागवणारा सुवर्णकाळ पुन्हा येणार आहे. यासाठी ‘वेणुग्राम अॅकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस‘ने पुढाकार घेतला आहे.
विविध नाटकांची मेजवानी देण्याचा प्रयत्न ही संस्था करणार आहे. याआधी फेब्रुवारीत संगीत सौभद्र आणि संशयकल्लोळ ही नाटके आयोजित  करण्यात आली होती. याला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामुळे उत्साहित झालेल्या या संस्थेने प्रशांत दामले व वर्षा उसगावकर यांचे ‘सारखं काही तरी होतंय‘ हे नाटक दि. 19 मार्चला केएलईच्या पुनर्रचित केएलई सेंटेनरी कन्व्हेन्शन सेंटर जेएनएमसी कॅम्पस (डॉ. जिरगे सभागृह) येथे सायं. 7 वा. आयोजित केले आहे. प्रशांत आणि वर्षा ही एव्हरग्रीन जोडी या नाटकातून धम्माल उडवून देण्यासाठी बेळगावात येत आहे.
दामले याबाबत म्हणतात, की बेळगावात प्रयोग करणे आम्हाला अभिमानाची बाब आहे. आई, वडील आणि मुलांचे नातेबंध कसे असतात, जसजशी पिढी बदलत जाते तसा त्यांचा दृष्टीकोन बदलत जातो. तसेच मातृत्व म्हणजेच आई हे यातून बिंबवले गेले आहे. विनोदाची अस्सल पेरणी ही या नाटकाची खासियत आहे. संकर्षण कऱ्हाडे हे दिग्दर्शक आहेत. उसगावकर म्हणतात, की या नाटकाच्या निमित्ताने मी ब्रेकनंतर पुन्हा रंगमंचावर येत आहे. तब्बल 36 वर्षांनंतर प्रशांतसोबत भूमिका करत आहे. चांगली भूमिका, तितकेच चांगले निर्माते आणि प्रशांत अशी चांगली भट्टी जमून आली आहे. बेळगावकर हा योग नक्कीच साधतील, याची खात्री आहे. बेळगावात या नाटकाचा प्रयोग करण्यास खूप उत्साहित आहे. नाटकाच्या देणगी प्रवेशिकेसाठी 9972046867 किंवा 9844131106 या मोबाईलवरवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले.