द. गो. जिल्हाधिकारी कार्यालयात लाच मागण्याचे प्रकार

अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांचा अधिकाऱ्यांवर आरोप, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, चौकशीची मागणी मडगाव : अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांची भेट घेऊन अर्जदार आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या लोकांकडून विविध पदांवरील अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लाच मागितली जात असल्याचा आरोप करताना जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी […]

द. गो. जिल्हाधिकारी कार्यालयात लाच मागण्याचे प्रकार

अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांचा अधिकाऱ्यांवर आरोप, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, चौकशीची मागणी
मडगाव : अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांची भेट घेऊन अर्जदार आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या लोकांकडून विविध पदांवरील अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लाच मागितली जात असल्याचा आरोप करताना जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी अँड कुतिन्हो यांनी केली. यावेळी चंद्रू यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. सर्वसामान्य जनतेने अशा प्रकारच्या तक्रारी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात, असे आवाहनही अॅड. कुतिन्हो यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात लहानसहान कामे करण्यासाठी 200 ते 500 ऊपयांची मागणी केली जाते. याबाबत आमच्याकडे पुरावे आहेत. मात्र आम्ही नावे आताच उघड करणार नाही. येथे दलालांमार्फत कित्येक कामे केली जातात.
हे दलाल सायंकाळी कार्यालयातून सुटण्याच्या वेळेस अधिकाऱ्यांना भेटण्यास येत असतात, असा दावा कुतिन्हो यांनी केला आहे. जर 1 हजार चौरस मीटर व त्याहून अधिक जमीन ऊपांतरित करायची असेल, तर फाईल मंत्र्यांना दाखविण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते. तसेच मंजुरीसाठी ठरलेले दर लाखोंच्या घरात आहेत, असा दावा अॅड. कुतिन्हो यांनी केला. अधिकारी मंत्र्यांचे नाव जमीन रुपांतरित करण्याच्या कामासाठी घेत असल्याने मंत्र्यांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त करताना याबाबतही चौलशीची मागणी अॅड. कुतिन्हो यांनी उचलून धरली. जर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार चौकशी करून कारवाई केली नाही अथवा लाच घेण्याचे प्रकार थांबले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा अॅड. कुतिन्हो यांनी दिला आहे. लोकांनी लाच न देता कामे होत नसल्यास आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दर चौरस मीटर जमिनीमागे 200 ऊपये घेऊन कामे केली जात असल्याचा दावा अरविंद कुतिन्हो यांनी केला. मलई दिली नाही, तर फाईल नामंजूर करण्याचे प्रकार येथे सुरू आहेत, असाही आरोप त्यांनी केला.