द. गो. जिल्हाधिकारी कार्यालयातील दुरुस्तीकामे प्राधान्यक्रमाने होणार
पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी दिलेली माहिती
मडगाव : मडगावातील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील शौचालयांची तसेच अन्य दुरुस्तीकामे प्राधान्यक्रमाने हाती घेतली जाणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी दिली. मंत्री सिकेरा दर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांची गाऱ्हाणी ऐंकण्यासाठी उपस्थिती लावतात. काल सिकेरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नादुऊस्त स्थितीत असलेल्या शौचालयांच्या दुऊस्तीवर भर देण्याचे ठरविले. या कामासाठी यापूर्वीच कंत्राटदाराला कामाचे आदेश देण्यात आले आहेत. 20 तारखेपासून काम हाती घेण्याचे आश्वासन आपणास कंत्राटदाराने दिलेले आहे, असे सिकेरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शौचालयातील मुतारी, नळ, दरवाजे यासाखी दुरुस्तीकामे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीतील सांडपाणी गळती समस्येवरही तोडगा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या गाऱ्हाणी ऐकण्याच्या कार्यक्रमावेळी नावेलीतील काही लोकांनी मलनिस्सारणासंदर्भातील गाऱ्हाणी मांडली. मात्र त्या विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित नसल्याने त्यावर तोडगा काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे हा विषय येत्या शुक्रवारी हाताळला जाणार असल्याचे सिकेरा यांनी स्पष्ट केले. रस्ते, पथदीप तसेच पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्न चर्चेस आले असता त्यावर तोडगे काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी द. गो. जिल्हाधिकारी कार्यालयातील दुरुस्तीकामे प्राधान्यक्रमाने होणार
द. गो. जिल्हाधिकारी कार्यालयातील दुरुस्तीकामे प्राधान्यक्रमाने होणार
पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी दिलेली माहिती मडगाव : मडगावातील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील शौचालयांची तसेच अन्य दुरुस्तीकामे प्राधान्यक्रमाने हाती घेतली जाणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी दिली. मंत्री सिकेरा दर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांची गाऱ्हाणी ऐंकण्यासाठी उपस्थिती लावतात. काल सिकेरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नादुऊस्त स्थितीत असलेल्या शौचालयांच्या दुऊस्तीवर भर देण्याचे ठरविले. या कामासाठी यापूर्वीच […]