युनियन ऑफ स्टेट ट्रान्स्पोर्ट ऑर्गनायझेशनतर्फे परिवहनचा गौरव

प्रतिनिधी/ बेळगाव सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी कर्नाटक परिवहनने महत्त्वाचे योगदान दिले आहे. रस्ते वाहतूक सुरक्षा व्यवस्थेची योग्य अंमलबजावणी केल्याबद्दल  युनियन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सतर्फे 2022-23 या वर्षातील सर्वोत्कृष्ट रस्ता सुरक्षा पद्धतींच्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय उपविजेता पुरस्कार देऊन परिवहनला गौरविण्यात आले आहे. मुख्य वाहतूक व्यवस्थापक विवेकानंद विश्वजना आणि अनुराग जैन यांनी पुरस्कार स्वीकारला. फेडरेशन ऑफ स्टेट […]

युनियन ऑफ स्टेट ट्रान्स्पोर्ट ऑर्गनायझेशनतर्फे परिवहनचा गौरव

प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी कर्नाटक परिवहनने महत्त्वाचे योगदान दिले आहे. रस्ते वाहतूक सुरक्षा व्यवस्थेची योग्य अंमलबजावणी केल्याबद्दल  युनियन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सतर्फे 2022-23 या वर्षातील सर्वोत्कृष्ट रस्ता सुरक्षा पद्धतींच्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय उपविजेता पुरस्कार देऊन परिवहनला गौरविण्यात आले आहे.
मुख्य वाहतूक व्यवस्थापक विवेकानंद विश्वजना आणि अनुराग जैन यांनी पुरस्कार स्वीकारला. फेडरेशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट ऑर्गनायझेशनच्या 64 व्या वार्षिक अधिवेशात हा पुरस्कार देण्यात आला. परिवहनच्या शक्ती योजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे महसुलात वाढ होऊ लागली आहे.