देशातील पहिली AI शिक्षिका! केरळात होतोय पहिलाच प्रयोग

नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंडेलिजेन्समध्ये सातत्याने विकास होतोय. रोज या फील्डमध्ये नवनवीन बदल होताय. भारतामध्येही या फिल्डमध्ये सातत्याने प्रगती होतेय. आता भारतातही एज्युकेशनच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर होतोय. याच क्रमात आता केरळ पहिला प्रदेश बनला जिथे एआयच्या मदतीने शिक्षण दिलं जातंय. यासाठी ह्यूमनॉइड रोबोटचा वापर केला जातोय. जेनेरेटिव्ह एआय स्कूल टीचरला गेल्या महिन्यातच शाळेत सामिल करण्यात […]

देशातील पहिली AI शिक्षिका! केरळात होतोय पहिलाच प्रयोग

नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंडेलिजेन्समध्ये सातत्याने विकास होतोय. रोज या फील्डमध्ये नवनवीन बदल होताय. भारतामध्येही या फिल्डमध्ये सातत्याने प्रगती होतेय. आता भारतातही एज्युकेशनच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर होतोय. याच क्रमात आता केरळ पहिला प्रदेश बनला जिथे एआयच्या मदतीने शिक्षण दिलं जातंय. यासाठी ह्यूमनॉइड रोबोटचा वापर केला जातोय. जेनेरेटिव्ह एआय स्कूल टीचरला गेल्या महिन्यातच शाळेत सामिल करण्यात आलंय. जीआता विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. केरळच्या तिरुवनंतपुरमच्या केटीसीटी हायर सेकेंडरी स्कूलमध्ये साडी नेसून शिवकणारी फीमेल टीचर रोबोटचं नाव ‘ईरीस’ आहे. या रोबोटमध्ये अनेक वैशिष्ट्य आहे. एआय रोबोट आणणारी कंपनी ‘मेकरलॅब्स एडुटेक’ नुसार आयरिस केरळमध्ये नाही तर देशात पहिली जेनेरेटिव्ह एआय टीचर आहे. रिपोर्ट्सनुसार ईरीस तीन भाषांमध्ये बोलू शकते. तसंच विद्यार्थ्यांच्या कठीण प्रश्नांची उत्तरही देऊ शकते. ईरीसचं नॉलेज बेस हे चॅटजीपीटीसारख्या प्रोग्रामिंगने तयार करण्यात आलंय. इतर ऑटोमेटिक शिक्षण उपकरणांच्या तुलनेत हे खूप व्यापक आहे.
व्हिडिओ पहा :http://makerlabs_official