दहावी, बारावी परीक्षा-1 चे अंतिम वेळापत्रक जाहीर
दहावी 25 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत तर बारावी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्चपर्यंत होणार
बेंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने 2023-24 या वर्षातील दहावी आणि बारावी परीक्षेचे (परीक्षा-1) अंतिम वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले. त्यानुसार दहावी वार्षिक परीक्षा दि. 25 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होणार आहे. तर बारावी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होईल. राज्याचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांनी वेळापत्रक सूचना फलकावर प्रदर्शित करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. दहावीच्या प्रथम भाषा विषयाचा पेपर 100 गुणांचा तर उर्वरित सर्व विषयांचे पेपर 80 गुणांचे होणार आहेत. प्रथम भाषा आणि ऐच्छिक विषयांच्या पेपरसाठी 3 तास व प्रश्नपत्रिका वाचनासाठी 15 मिनिटे, तसेच द्वितीय भाषा, तृतीय भाषा विषयांचे पेपर लिहिण्यासाठी 2 तास 45 मिनिटे व प्रश्नपत्रिका वाचनासाठी 15 मिनिटे वेळ असणार आहे. प्रथम भाषा विषयाचा पेपर सकाळी 10:30 ते दुपारी 1.45 या वेळेत होईल. द्वितीय भाषा, तृतीय भाषा विषयांचे पेपर सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत होतील.
Home महत्वाची बातमी दहावी, बारावी परीक्षा-1 चे अंतिम वेळापत्रक जाहीर
दहावी, बारावी परीक्षा-1 चे अंतिम वेळापत्रक जाहीर
दहावी 25 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत तर बारावी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्चपर्यंत होणार बेंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने 2023-24 या वर्षातील दहावी आणि बारावी परीक्षेचे (परीक्षा-1) अंतिम वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले. त्यानुसार दहावी वार्षिक परीक्षा दि. 25 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होणार आहे. तर बारावी परीक्षा 1 मार्च […]