मजगावच्या शेतकऱ्यांकडून स्वखर्चाने शेतवडीतील रस्ता बनविण्यास प्रारंभ
मजगाव : मजगावातील शेतवडीतील रस्ते पूर्ण निकामी, चिखलमय झाले आहेत. पायी चालणेही अवघड झाले होते. शेतमजुरांना पावसाळ्यात शेताकडे ये-जा करण्यासाठी खबरदारी म्हणून मजगावच्या सर्व शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जेसीबी व ट्रॅक्टर्स लावून येथील श्री ब्रह्मदेव मंदिरासमोरील तलावातील लाल माती रस्त्यावर टाकून ये-जा करण्यासाठी सोयीस्कर करत आहेत. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणीही न फिरकल्याने सर्व तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेवून रस्त्यावर लाल माती टाकल्याने ये-जा करण्यास सोयीस्कर झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून सदर रस्ता प्रशासनामार्फत खडीकरण करून द्यावा आणि शेतकऱ्यांचा दुवा घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Home महत्वाची बातमी मजगावच्या शेतकऱ्यांकडून स्वखर्चाने शेतवडीतील रस्ता बनविण्यास प्रारंभ
मजगावच्या शेतकऱ्यांकडून स्वखर्चाने शेतवडीतील रस्ता बनविण्यास प्रारंभ
मजगाव : मजगावातील शेतवडीतील रस्ते पूर्ण निकामी, चिखलमय झाले आहेत. पायी चालणेही अवघड झाले होते. शेतमजुरांना पावसाळ्यात शेताकडे ये-जा करण्यासाठी खबरदारी म्हणून मजगावच्या सर्व शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जेसीबी व ट्रॅक्टर्स लावून येथील श्री ब्रह्मदेव मंदिरासमोरील तलावातील लाल माती रस्त्यावर टाकून ये-जा करण्यासाठी सोयीस्कर करत आहेत. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणीही न फिरकल्याने सर्व तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार […]